आई सांगते माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका तरी…अजित पवारांना अश्रू अनावर, युगेंद्र पवार काय म्हणाले?

  • Written By: Published:
आई सांगते माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका तरी…अजित पवारांना अश्रू अनावर, युगेंद्र पवार काय म्हणाले?

Ajit Pawar Vs Yugendra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल मी सुप्रियाच्या विरोधात पत्नी सुनेत्राला उभं करायला नको या गोष्टीचा पुन्हा उल्लेख केला. तसंच, मी जी चूक केली तीच तुम्ही आता माझ्या विरोधात (Ajit Pawar) युगेंद्र पवारला उभ करून करत आहात असा थेट घणाघात अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर केला. ते उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजीत सभेत बोलत होते.

मी मनाचा मोठेपणा दाखवला चूक कबूल केली. मात्र, आता चूक कोणी केली, पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची कुटुंब आहोत. आम्ही बिकट परिस्थितीमधून वर आलो, आईने आधार दिला असं म्हणत माझी आई सांगते फॉर्म भरू नका माझ्या दादाच्याविरोधात. परंतु, तरीही फॉर्म भरला. हे जे काय चाललं आहे ते बरोबर नाही, मग त्याच्यामध्ये मोठ्या व्यक्तींनी सांगायला पाहिजे होतं, फॉर्म कोणी भरायला सांगितला तर साहेबांनी फॉर्म भरायला सांगितला, म्हणजे साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? असा थेट आरोपच अजित पवार यांनी यावेळी केल्याचं दिसंल. दरम्यान, अजित पवारांना अश्रू अनावर झाले. ते एक बॉटल पाणीही पेले.

शिंदेंच्या सेनेची तिसरी यादी; संगमनेरमधून खताळ, थोरातांविरुद्ध लढण्याचे सुजय विखेंचे स्वप्न भंगले !

या प्रकारावर युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी प्रचारात होते, त्यामुळे दादांचं सर्व भाषण ऐकता आलं नाही, पण त्यांच्या भाषणातील काही मुद्दे पाहिले, वाचले. मी त्यांच्यापेक्षा वयाने खुप लहान आहे. आपल्यापेक्षा मोठे किंवा वरिष्ठ असतात, त्यांच्यावर बोलायचं नसतं. त्यामुळं मी त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही, असं युगेंद्र पवार यावेळी म्हणाले.

साहेबांनी आमचं घर फोडल का? या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, मला तसं वाटत नाही. पवार कुटूंबात वेगवेगळ्या विचारांची लोक होते. इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये अॅक्टीव्ह होते, तरीदेखील आमचं कुटूंब एकत्र होतं. त्याचप्रमाणे यापुढे देखील आपले विचार वेगळे असतील तरी कुटूंब एकत्र असेल. आमच्या कुटूंबाला कधी भाजपची विचार पटले नाहीत. आम्ही जिथं काल होतो, त्याच विचारांचे आज आहोत, असंही युगेंद्र पवार यावेळी म्हणाले आहत.

आजीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

लहानपणापासून माझी आजी मला आशिर्वाद देत आली आहे. माझं आणि आजीचं एक वेगळं असं भावनिक नातं आहे. एका नातवाचं आणि आजीचं एक वेगळं नातं असतं. कधीच मी आजीला राजकारणात आणलं नाही, मी त्यांचा फोटो कधी पोस्ट केला नाही, आणि आजीला मला कधी राजकारणात आणायचं नाही. तो विषय कुठेतरी थांबलं पाहिजे, असंही युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube