Video : अजितदादांच्या मागे चौकशीचा ससेमिरा कुठून सुरू झाला; फडणविसांनी नावं घेत सांगितलं
Devendra Fadnavis Statement On Ajit Pawar Inquiry : अजित पवार (Ajit Pawar) यांनी तासगावमध्ये संजयकाका यांच्या प्रचारसभेत सिंचन घोटाळ्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. अजित पवार म्हणाले की, सिंचन घोटाळ्याच्या आरोपांच्या फाईलवर सही करून आर आर पाटील यांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते, असं त्यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं होतं. यावर आता उपमुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अजित पवार यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा कुठून सुरू झाला, हे सांगत थेट नाव घेतलं आहे.
सिंचन घोटाळ्यासंदर्भातील अजित पवारांच्या वक्तव्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आर आर पाटील सध्या हयातीत नाही. ते कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्यावर बोलणं मला योग्य वाटत नाही, असं भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस म्हणाले (Devendra Fadnavis) आहेत. परंतु हे सत्य आहे की, अजित पवार यांच्यावर जी चौकशी सुरू झाली, ती कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं त्या काळातच सुरू झाली. अजित पवारांची चौकशी कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातच सुरु झाली, असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय.
ही निकालानंतरची विजयी सभाच…राहुरीत शिवाजीराव कर्डिले यांचं भव्य शक्तीप्रदर्शन
माहीम विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा करू नये, याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील मान्यता होती. परंतु याच्यात त्यांना काही अडचणी आल्या. मनसेकडून माहीममध्ये अमित ठाकरे यांना तिकीट देण्यात आलंय. अमित ठाकरे यांनी पाठिंबा द्यायला हवा, हे भाजपचे (BJP) मत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. आमची पहिल्यापासून भूमिका होती, की राज ठाकरे यांनी या एका जागेवर पाठिंबा मागितलेला आहे. तो आपण दिला पाहिजे, त्यामुळे भाजपने अमित ठाकरेंना पाठिंबा दिलाय.
आव्वाज कुणाचा? राज्यातील तब्बल ४७ मतदारसंघांत शिवसेना VS शिवसेना सामना..
बऱ्याच ठिकाणी अपक्ष अर्ज भरले गेले आहेत. सर्वच पक्षांत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालीय. आमचा प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त बंडखोर कसे पर घेता येतील, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करु. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, असं फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत.