अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचा मतदारसंघात झंझावती प्रचार सुरू आहे. त्यांनी शिराळा सर्कल परिसरात नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी
कमिशन खोर सरकारला खाली खेचण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा, असं आवाहन केलंय.
पक्ष फोडणारे दोन तीन लोक, पराभव करा, शरद पवारांचा परळीत रोख कुणाकडे?
गावोगावी जंगी स्वागत…
तिवसा विधानसभामतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर या काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आहे. दरम्यान, त्यांनी शुक्रवारी सकाळी सावंगा आसरा देवी येथील मंदिरात आरती करून दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह महापुरुषांना वंदन करून पदयात्रा काढली. प्रचार रॅली दरम्यान यशोमती ठाकूर यांचे गावोगावी जंगी स्वागत करण्यात आले. महिलांनी यशोमती ठाकूर यांना ओवाळून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. विविध गावांत नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने यशोमती ठाकूरही भावूक झाल्या.
बैठका आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून यशोमती ठाकूर यांनी नागरिकांशी चर्चा केली. येणाऱ्या काळात तिवसा मतदार संघात विविध योजना आणून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
महायुती सरकार कमिशन खोर सरकार…
भाजपा व त्यांच्या सहकाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करून गरीब घटकावर अन्याय केला आहे. कमिशन खोर सरकारला खाली खेचण्यासाठी एकत्र येऊन महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन यशोमती ठाकूर यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले. त्यांच्या प्रचारार्थ शिराळा, देवरा, देवरी, यावली, डवरगाव चिंचखेड, करजगाव, नांदुरा पिंगळाई, धानोरा कोकाटे, ब्राह्मणवाडा गोविंदपूर या गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
तर मतदारांनी केवळ मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी सतत झटणाऱ्या यशोमती ठाकूर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
मतदारसंघातील शिराळा सर्कलमध्ये यशोमती ठाकूर यांचे वर्चस्व असून त्यांना या भागातील मतदार मोठ्या मताधिक्याने कौल देतील, असा विश्वास महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आहे.