Ayodhya Ram Mandir Earnings : अयोध्येत उद्या श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) आहेत. देशातील कोट्यावधी जनता या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या सोहळ्यात सहभागी (Ayodhya Ram Mandir Earnings) होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राजकारणी मंडळी अयोध्येत हजेरी लावणार आहेत. या सोहळ्यानिमित्त उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh) अयोध्येचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. अयोध्येत आता तुम्ही गेलात तर तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही इतकी अयोध्या नगरी बदलली आहे. उत्तर प्रदेश सरकारलाही त्याचा मोठा फायदा होणार असून राज्याच्या तिजोरीत दरवर्षी धनवर्षाव होणार आहे. सन 2025 या आर्थिक वर्षा राज्याल जवळपास 20 हजार ते 25 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई होण्याचा अंदाज आहे. एसबीआयच्या रिसर्च (SBI Research Report) अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या अर्थसंकल्पात दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2024 मध्ये सरकारचे कर संकलन अडीच लाख कोटी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एसबीआय रिसर्च रिपोर्टनुसार 2022 च्या तुलनेत 2024 या वर्षात उत्तर प्रदेशात येणाऱ्या पर्यटकांद्वारे केला गेलेला खर्च दुप्पट होण्याची शक्यता आहे.
Ayodhya Ram Mandir : उद्याच्या सुट्टीवर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब; याचिका फेटाळली
या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणे आणि उत्तर प्रदेश सरकारने पर्यटन वाढविण्यासाठी उचललेली पावले या वर्षाच्या अखेरीस राज्यातील पर्यटन खर्च चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये देशातील पर्यटकांनी उत्तर प्रदेशात 2.2 लाख कोटी रुपये खर्च केले होते. तर विदेशी पर्यटकांनी 10 हजार कोटी रुपये खर्च केले होते. 2022 मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून 32 कोटी पर्यटक उत्तर प्रदेशात आले होते. जे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 200 टक्के जास्त आहे. 2022 मध्ये 2.21 कोटी पर्यटक अयोध्येत आले होते. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत येण्याची शक्यता आहे.
या अहवालात आर्थिक आणि सामाजिक-आर्थिक निकषांवर उत्तर प्रदेश सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले आहे. यामध्ये महिलांचा टक्का वाढणे, नवकल्पना आणि निर्यातीत वाढ यांचा समावेश आहे. 2028 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल आणि उत्तर प्रदेशचा जीडीपी 500 अब्ज डॉलरच्या पुढे जाईल, असे अहवालात म्हटले आहे. उत्तर प्रदेशचा जीडीपी 2024 च्या आर्थिक वर्षा 24.4 लाख कोटी रुपये म्हणजेच 298 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. अहवालात म्हटले आहे, की आर्थिक वर्ष 2028 पर्यंत उत्तर प्रदेश देशाच्या जीडीपीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल असा अंदाज आहे.
Ram Mandir : CM शिंदे एकटे नाही तर मंत्रिमंडळालाच नेणार; अयोध्या दौऱ्याचं प्लॅनिंग काय?