Video: रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना ‘हा’ प्रसाद मिळणार

Video: रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना ‘हा’ प्रसाद मिळणार

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला (Ayodhya Ram Mandir) होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. दरम्यान, राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाला उपस्थित असलेले व्हीव्हीआयपी, साधू आणि विशेष पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या प्रसादाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना दिलेला प्रसादाचा डबा दिसत आहे. या बॉक्सवर राम मंदिराचा फोटो असून मोठ्या अक्षरात प्रसादम लिहिलेले आहे.

यासोबतच या प्रसादाचा डबा उघडल्यावर एका बाजूला कंदमूळ, सरजू नीर, कुमकुम आणि रुद्राष्टम लिहिलेले आहे, त्यांच्या खाली श्लोकही लिहिलेला आहे. प्रसादचा डबा बघितला तर या बॉक्समध्ये अनेक गोष्टी असू शकतात हे स्पष्ट होते. कारण बॉक्समध्ये एक छोटी बाटली देखील दिसत आहे. त्यातून स्पष्टपणे दिसते की त्यात सरयूचे पाणी असू शकते. यासोबतच या प्रसादाच्या डब्यात एक छोटा डबा, कुमकुम आणि लाडूही दिसत आहे.

रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ कसा बनवला गेला? आरोपींचे मोठे खुलासे

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यात राजकारणी, अभिनेते, खेळाडू आणि उद्योगपतींचा समावेश आहे. यासोबतच या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी परदेशी पाहुणेही येत असून त्यासाठी 100 हून अधिक चार्टर विमाने अयोध्या आणि लखनऊमध्ये उतरणार आहेत. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासंदर्भात अयोध्येतही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube