Ram Mandir : CM शिंदे एकटे नाही तर मंत्रिमंडळालाच नेणार; अयोध्या दौऱ्याचं प्लॅनिंग काय?

Ram Mandir : CM शिंदे एकटे नाही तर मंत्रिमंडळालाच नेणार; अयोध्या दौऱ्याचं प्लॅनिंग काय?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत उद्या श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) आहेत. देशातील कोट्यावधी जनता या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राजकारणी मंडळी अयोध्येत हजेरी लावणार आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उद्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला एकटे उपस्थित राहणार नाहीत तर संपूर्ण मंत्रिमंडळाला घेऊनच अयोध्येत जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर केलेल्या एका पोस्टमधून मिळत आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांनी एक पोस्ट लिहीली आहे. जय श्रीराम, अयोध्येत राम मंदिर उभारणीचे कोट्यावधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साकार केलं आहे. मोदीजींचे शतशः आभार.. अयोध्येत सोमवारी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच.

देशवासियांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.

त्यांच्या या पोस्टनंतर त्यांच्या अयोध्येतल्या उपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामागे काय कारण आहे याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. परंतु, सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता त्यांनी हा निर्णय घेतला का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिंदे यांच्या या पोस्टनंतर आता राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

‘निवडणूक अवघड म्हणून भाजपाने राम मंदिर समोर आणलं’ पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube