Download App

Ayodhya Ram Mandir : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार होते तरी कुठे ?

  • Written By: Last Updated:

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा (Ayodhya Ram Mandirr) प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यासाठी देशभरात जोरदार उत्साह होता. सिनेकलाकार, उद्योजक यांच्यासह हजारो भाविक अयोध्येत हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झाले होते. राम मंदिर उभारून भाजपकडून (BJP) एकप्रकारे देशवासियांची स्वप्नपूर्ती केली आहे. परंतु भाजपचे दिग्गज नेते, अनेक राज्यातील महत्त्वाचे नेते मात्र या सोहळ्याला हजर राहिलेले नाहीत. या नेत्यांना अयोध्याला येण्याचे निमंत्रणही होते. हे महत्त्वाचे नेते होते तरी कुठे याबाबत जाणून घेऊया…

BCCI Annual Award: शुभमन गिलला 2023 चा ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार

अमित शाह-जेपी नड्डा-नितीन गडकरी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही अयोध्याला गेले नव्हते. त्यांनी अयोध्याचा सोहळा टीव्हीवर लाइव्ह पाहिला. अमित शाह हे दिल्लीत होते. इतर केंद्रीय मंत्रीही आपल्या-आपल्या राज्यातील मंदिरामध्ये गेले होते. अमित शाह यांनी या सोहळ्यानिमित्त दिल्लीतील बिर्ला मंदिरात पूजा-अर्चा केली. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे नवी दिल्लीत होते. त्यांनी झंडेवालन मंदिरात पूजा केली. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मतदारसंघात नागपूरमध्ये होती. त्यांनी घरात पूजा-अर्चा केली. अयोध्यातील सोहळा टीव्हीवरून लाइव्ह पाहिला. तर नागपूरमधील कर्णबधीर शाळेतील मुलांबरोबर रामरक्षा आणि श्रीराम आरती ही गडकरी यांनी म्हटली.

मुख्यमंत्र्यांची ठाण्यात पूजा, मुंबईत रॅली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानेही या दिवसाची जय्यत तयारी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाण्यातील टेंभीनाका शिवसेना शाखेच्या वतीने आज श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खास पूजेचे आयोजन केले होते. तसेच त्यांनी ठाणे शहरातील राजस्थान श्वेतांबर मूर्तिपूजक संघ आणि ऋषभदेवजी महाराज जैन धर्म मंदिर आणि ज्ञाती ट्रस्टने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीला वंदन केले. त्यानंतर रात्री मुंबईमध्ये शिंदे गटाकडून शोभा यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतर मंत्री उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये होते. त्यांनी रामनगर येथील मंदिरात जावून पूजा केली. त्यानंतर फडणवीस हे अमरावतीतील कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केले होते. तेथे कारसेवकांचा सत्कार करण्यात आला आहे. फडणवीस यांनी कारसेवेचा अनुभव सांगितला. तसेच तुरुंगवास भोगल्याचा अनुभव फडणवीस यांनी सांगितला.

उल्हास पाटलांनी लेकीसाठी भाजपची वाट धरली… पण रक्षा खडसे, अमोल जावळे आधीच तिकीटाच्या स्पर्धेत!


उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सकाळी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामलल्ला मूर्तीचे ट्वीट केले होते. परंतु अजित पवार हे कुठे सोहळ्यात उपस्थित होते का ? हे मात्र त्यांनी आपल्या सोशल मीडियावर टाकलेले नाही.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे ही आपल्या जिल्ह्यात होते. महालक्ष्मी जगदंबा माता कोराडी संस्थानाने जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी यांच्या सहकार्याने “सहा हजार किलोंचा हलवा” एकाच वेळी बनवत या हलव्याचा प्रसाद व या निमित्ताने झालेले सर्व विश्वविक्रम प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी अर्पण केले. या सोहळ्याला बावनकुळे उपस्थित होते.

follow us