Madhuri Dixit : बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून ओळख असलेल्या माधुरी दिक्षितने (Madhuri Dixit) राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. मागील काही वर्षांपासून माधुरी राजकारणात प्रवेश करुन भाजपच्या (BJP) तिकीटावरुन निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना ऊत आल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने माझी आवड राजकारण नाहीतर हेल्थकेअर संबंधित काम करायचं असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता माधुरी दिक्षित (Madhuri Dixit) राजकारण येणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Karnataka : कर्नाटकात राडा! ‘इंग्रजी’ फलकांची तोडफोड; ’60 टक्के कन्नड’च्या आदेशाचा वाद पेटला
माधुरी दिक्षित म्हणाल्या, निवडणूक लढवणे हे माझी बकेटलिस्ट नाही. हे काम इतरांचं आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी माझ्या राजकारणाच्या प्रवेशाबाबत चर्चा केली जाते. पण माझी आवड ही राजकारण नाहीये, 2024 मध्ये माझा ‘पंचक’ या चित्रपटाला यश मिळालं तर मी आणखी चित्रपट करणार आहे. मला हेल्थकेअर संबंधित काम करायचं असल्याचंही माधुरीने यावेळी स्पष्ट केलं आहे.
Sanjay Raut : भाजप रणछोडदास! त्यांचा जन्मच 2014 नंतरचा, इतिहास काय माहित? राऊतांचा हल्लाबोल
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने यांनीही हजेरी लावत मनमोकळेपणाने संवाद साधल्याचं पाहायला मिळालं आहे. राजकारणाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला श्रीराम नेने यांनीही प्रत्युत्तर देत नेमकी कशात आवड आहे? याबाबत भाष्य केलं आहे. समाजात चांगल्या प्रकारे सुधारणा करण्यात आल्या तर भारत देश हा पहिल्या क्रमांकावर येणार असून भारतातील लोकं खूप हुशार आहेत. राजकारण हे क्षेत्र वगळता इतर अनेक क्षेत्रात यशस्वी होता येत, आमचा पिंड हा राजकारण नसून लोकांना मदत करायला आम्हाला दोघांनाही आवडत असल्याचं नेने यांनी स्पष्ट केलं आहे.
भुजबळांच्या समान जागा वाटपाची हवा तटकरेंनीच काढली, म्हणाले आमचा अंतिम निर्णय…
दरम्यान, मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान, अभिनेत्री माधुरी दिक्षित निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात येत होतं. एवढचं नाहीतर माधुरी भाजपच्या तिकीटावरुन निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्याही चर्चा ऐकायला मिळत होत्या. यासंदर्भातील बातम्याही प्रसारित करण्यात आल्या होत्या. मात्र, या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं पाहायला मिळालं होतं. आताही माधुरीच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल खुद्द माधुरीनेच स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे तूर्तास तरी माधुरी राजकारणात उतरणार नसल्याचं दिसून येत आहे.