Lok Sabha : चित्रपटात अगदी डॅशिंग भूमिका, तितकेच जबरदस्त डायलॉग, बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटातील अभिनेते ज्यावेळी नेते होतात. खासदारकी मिळवत संसदेत जातात. पण, येथे मात्र तोंडातून चकार शब्दही काढत नाही. एकतर संसदेत हजरच राहत नाहीत आणि राहिले तर एकदम शांतच असतात, असे काही अभिनेते खासदार आहेत ज्यांचं प्रगतीपु्स्तक नुकतच समोर आलं आहे. सतराव्या लोकसभेच्या कामकाजादरम्यान अभिनेता राजकारणी सनी देओल (Sunny Deol) आणि शत्रुघ्न सिन्हा (टीएमसी) यांच्यासह अन्य नऊ लोकसभा सदस्यांनी (Lok Sabha) चर्चेत भागच घेतला नाही.
संसदेत शंभर टक्के उपस्थिती असणाऱ्या खासदारांत भारतीय जनता पार्टीचे मोहन मंडावी आणि भगीरथ चौधरी यांचं नाव आहे. एकूण 274 बैठकांत त्यांनी शंभर टक्के हजेरी लावली. विशेष म्हणजे लोकसभेत पोहोचलेल्या या दोन खासदारांना सभागृहात शेजारीच जागा मिळाली होती. संसदेत विविध प्रश्नांवर चर्चा झाली. या चर्चांमध्ये सहभाग घेणाऱ्या खासदारांत पुष्पेंद्रसिंह चंदेल (भाजप), कुलदीप राय शर्मा, डीएनव्ही सेंथिलकुमार (डीएके), एनके प्रेमचंदन (आरएसपी), सुप्रिया सुळे (शरद पवार गट) यांचा समावेश आहे.
सनी देओलची रद्द झालेली नोटीस अन् नितीन देसाईंची आत्महत्या : मराठी माणसाने हे विसरता कामा नये!
अभिनेता सनी देओल, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह भाजप खासदार रमेश जिनजीनगी, बीएन बचेगौडा, प्रधान बरुआ, अनंतकुमार हेगडे आणि व्ही. श्रीनिवास प्रसाद, टीएमसी खासदार दिब्येंदू अधिकारी आणि बसपा खासदार अतुल कुमार राय या खासदारांनी चर्चेत भागच घेतला नाही. या सरकारच्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहात अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र, या चर्चेत सनी देओल, शत्रुघ्न सिन्हा या अभिनेत्या खासदारांनी भागच घेतला नाही. सनी देओल ज्यावेळी भाजपाच्या तिकीटावर खासदार झाला होता. त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.
सनी देओलची राजकारणातील नवी इनिंग कशी राहिल याचीही उत्सुकता होती. मात्र, चित्रपटात जरी तो यशस्वी ठरला असला तरी राजकारणाच्या मैदानात मात्र साफ अपयशी ठरला. सनी देओलच्या गुरदासपूर (पंजाब) या लोकसभा मतदारसंघातील नागरिकच त्याच्यावर कमालीचे नाराज आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याबाबतीतही अशीच परिस्थिती आहे.
सनी देओलच्या नव्या घोषणेनं भाजपला धक्का; म्हणाला मी 2024 ची निवडणूक..