सनी देओलच्या नव्या घोषणेनं भाजपला धक्का; म्हणाला मी 2024 ची निवडणूक..

सनी देओलच्या नव्या घोषणेनं भाजपला धक्का; म्हणाला मी 2024 ची निवडणूक..

Sunny Deol : गदर -2 (Gadar 2) चित्रपटाचे तुफान यश अन् त्यानंतर कर्ज थकवले म्हणून बँकेने धाडलेली घराच्या लिलावाची नोटीस या कारणांमुळे चर्चेत आलेला बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आता आणखी एका कारणाने चर्चेत आला आहे. खासदार असलेल्या सनी देओलने मोठी घोषणा केली आहे. आगामी 2024 ची निवडणूक लढणार नाही, असे सनी देओलने जाहीर केले आहे. यानंतर पुढे काय करणार याचे उत्तरही त्याने दिले आहे.

सनी पाजीने थकवले कोट्यावधींचे कर्ज; बँकेने थेट धाडली घराच्या लिलावाची नोटीस

सन 2019 मध्ये भाजपाच्या तिकीटावर सनी देओल निवडून आला होता. आता मात्र त्याने निवडणूक लढणार नसल्याचे सनी देओलने स्पष्ट केले आहे. मनोरंजनाच्या जगात मी माझ्या मनाप्रमाणे काम करतो. मला जी भूमिका आवडते ती भूमिका मी साकारतो. मात्र राजकारणाचं तसं नाही. मी कुणाला काम करण्याचं आश्वासन दिलं आणि ते माझ्याकडून झालं नाही तर मला हे सहन होत नाही, असे सनी देओल म्हणाला.

संसदेत देश चालवणारे लोक बसले आहेत. मात्र त्यांची वागणूक तुम्ही पाहिली का, मी हे पाहिलं की मला वाटतं की मी असा नाही. मी एक विचार घेऊन राजकारणात आलो होतो. मात्र आता माझ्या लक्षात आलं आहे की मी जे काही काम करतो आहे ते एक अभिनेता म्हणूनही करू शकतो. एकाचवेळी दोन कामे करणे माझ्यासाठी शक्य नाही. त्यामुळे मी आता 2024 मधील लोकसभा निवडणूक लढणार नाही.

‘हेच मोदी सरकारचे खायचे दात, निवडणुकीत जनता घालील घशात’; कांदाप्रश्नी ठाकरे गटाचा घणाघात

सनी देओलची खासदारकी रद्द करा

मागील निवडणुकीवेळी सनी देओलने जी आश्वसने दिली होती ती पूर्ण केली नाहीत असा आरोप होत आहे. त्याच्या गुरुदासपूर या मतदारसंघातही तो कधी फिरकला नाही असा लोकांचा आक्षेप आहे. सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टरही गुरुदासपूरमध्ये लावण्यात आले होते. विरोधकांनी या मुद्द्यावर भर देत भाजपवर टीका केली होती. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र पाठवून सनी देओलची खासदारकी रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube