Aishwarya Thackeray in a negative role against Ahan Pandey in Yash Raj Films’ untitled action romance : गेल्या काही वर्षांपासून ऐश्वर्य ठाकरे हे नव्या पिढीतील सर्वाधिक चर्चेत असलेले कलाकार ठरले आहेत. अनुराग कश्यप यांच्या निशांची मध्ये त्यांच्या प्रभावी अभिनयाने त्यांना सर्वत्र कौतुक मिळाले. त्यांची करिष्माई स्क्रीन प्रेझेन्स आणि आत्मविश्वासपूर्ण परफॉर्मन्स यांनी ते पाहण्यासारखे तरुण प्रतिभावंत असल्याचे सिद्ध केले आहे.
ब्रेकिंग : राष्ट्रपती अन् राज्यपाल विधेयकांसाठी कालमर्यादा ठरवू शकत नाहीत; SC चा मोठा निर्णय
आता ऐश्वर्य यांना आणखी एक मोठी ओळख मिळाली आहे—दिग्गज दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी वायआरएफ च्या अॅक्शन रोमॅन्स चित्रपटात त्यांना नेगेटिव लीड म्हणून साइन केले आहे. येथे त्यांचा सामना सैयारा स्टार अहान पांडे यांच्याशी एक तीव्र, रक्तरंजित संघर्षात होणार आहे. ही ताज्या आणि तरुण कलाकारांची कास्टिंग देशातील दोन उत्कृष्ट उभरत्या अभिनेत्यांमध्ये एक रोमांचकारी भिडंतीची मेजवानी देणार आहे.
सॉरी, आई… चिठ्ठीत शिक्षिकांची नावं लिहित सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत जीवन संपवलं…
अली अब्बास जफर यांनी वाय रएफ च्या पुढील चित्रपटासाठी अहान पांडे, शर्वरी आणि ऐश्वर्य ठाकरे—हे तिघेही उत्तम तरुण कलाकार एकत्र आणले आहेत. प्रेक्षकांनी सैयाराच्या ऐतिहासिक यशातून हे सिद्ध केले आहे की त्यांना नव्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर चमकताना पाहण्याची इच्छा आहे आणि त्या प्रेमामुळेच हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा प्रेम कथा ठरला.
एका ट्रेड सूत्राने सांगितले,“अली अब्बास जफर हे सुलतान आणि टायगर जिंदा है सारख्या मेगा ब्लॉकबस्टर्ससाठी ओळखले जातात. त्यांच्यावरून अशी अपेक्षा ठेवता येते की अहान आणि ऐश्वर्य यांची भिडंत मोठ्या पडद्यावर जबरदस्त, धडकी भरवणाऱ्या अॅक्शन सिक्वेन्ससारखी उभी राहील. ही एक मोठ्या प्रमाणावर उभारलेली फिल्म आहे. ज्याच्या मध्यभागी रोमॅन्स असून अॅक्शन प्रेक्षकांना थरार आणि आश्चर्याचा अनुभव देईल. अली ही फिल्म प्रेक्षकांसाठी रोलरकोस्टर राइड ठरावी यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत”
धक्कादायक! पुण्यातील डेक्कनमध्ये रेस्टॉरंट आणि बारवर कोयत्याचा धाक दाखवत मध्यरात्री दरोडा
सूत्र पुढे म्हणतात,“खरं सांगायचं तर, या चित्रपटासाठी अलीकडे भारतीय सिनेमातील सर्वोत्तम तरुण कास्ट आहे. त्यांच्या स्टोरीटेलिंगच्या कौशल्यासोबत मोठ्या पडद्यावर व्हिज्युअल स्पेक्टेकल निर्माण करण्याच्या अनुभवामुळे ही तिघे कलाकार अतिशय भव्य पद्धतीने सादर केले जातील. मोठ्या चित्रपटांमध्ये तरुण कलाकारांना संधी मिळणे ही उद्योगासाठी आणि या कलाकारांसाठीही मोठी संधी आहे. कारण भविष्यात इंडस्ट्रीची जबाबदारी यांच्याच खांद्यावर असेल.”
