Amrita Khanvilkar : सध्या अमृता खानविलकर चर्चेत आहे ती तिच्या अफलातून लावणी रील मुळे विषय असा की अमृताने (Amrita Khanvilkar) अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ला तिच्या आगामी ” आलेच मी ” (Aaleche Mee) या लावणी साठी खास शुभेच्छा देण्यासाठी याच गाण्यावर दमदार परफॉर्मन्स करून हा व्हिडिओ तिने सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे आणि एवढं काय प्रेक्षकांनी तिचं कौतुक केलं.
अमृताच्या या व्हिडिओवर कॉमेंट्सचा पाऊस पडला असून तिने हा खास व्हिडिओ करण्यामागचं कारण देखील स्पष्ट केलं आहे या बद्दल बोलताना अमृता म्हणते ” खरंतर इंडस्ट्रीत आपल्या मित्र मंडळीना त्यांचा नवनवीन कामासाठी आम्ही सगळेच शुभेच्छा देतो. सई ही माझी अत्यंत जवळची आणि आवडती कलाकार मैत्रीण आहे तिने पहिल्यांदा लावणी सादर केली आणि ती कमाल झाली आहे तिला तिच्या पहिल्या वहिल्या लावणी ला शुभेच्छा देण्यासाठी मी आणि आशिष ने हा व्हिडिओ केला आहे.
दुसरं आणि खास कारण माझं आणि लव फिल्मच जुन नात आहे अगदी मलंग या माझ्या चित्रपटापासून माझं हे नात आहे देवमाणूस हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट असल्याने अंकुर आणि त्यांचा संपूर्ण टीमला शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ मी केला आहे” अमृताने चंद्रमुखी चित्रपटात “चंद्रा” ही लावणी साकारली होती आणि आजही ती तितकीच सदाबहर आहे.
अलिकडेच तिचं “चिऊताई चिऊताई दार उघड” हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आल. आता तिचा सई ताम्हणकरच्या “आलेच मी” या गाण्यावर केलेल्या लावणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. लावणीसाठी अमृता खानविलकरने ऑफ व्हाइट रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे.
कर्जतमध्ये राजकारण तापलं! सभापती शिंदेंवर आरोप करत नगराध्यक्ष राऊत यांनी राजीनामा दिला
मोकळे केस, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर टिकलीने तिचा लूक खूपच भारी दिसत आहे. येणाऱ्या काळात अमृता अनेक हिंदी मराठी प्रोजेक्ट्स मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार असल्याचं कळतंय.