25 एप्रिलला धिंगाणा होणार, ‘देवमाणूस’ मध्ये सई ताम्हणकर थिरकणार पहिल्यांदाच लावणीवर

25 एप्रिलला धिंगाणा होणार, ‘देवमाणूस’ मध्ये सई ताम्हणकर थिरकणार पहिल्यांदाच लावणीवर

Sai Tamhankar : ‘देवमाणूस’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो 2025 च्या बहुचर्चित मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. तेजस देऊस्कर (Tejas Deoskar) दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ निर्मित, या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणूका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

नुकतीच या चित्रपटातील महत्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’ (Devmanoos) मध्ये पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे. हे गाणे एप्रिलमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सई ताम्हणकरच्या (Sai Tamhankar) चाहत्यांसाठी तसेच मराठी प्रेक्षकांसाठी ही एक विशेष भेट असणार आहे.

पहिल्यांदाच सई मोठ्या पडद्यावर लोककला सादर करताना दिसणार आहे. याबद्दल सई सांगते, “लव फिल्म्ससोबत काम करण्याची आणि ‘देवमाणूस’ परिवाराचा भाग होण्याची संधी मिळाल्याने मी प्रचंड आनंदी आहे. अशा प्रतिभावान टीमसोबत काम करणे एक अविस्मरणीय अनुभव आहे.

निवडणूक प्रक्रियेत होणार बदल, द्यावा लागणार नागरिकत्वाचा पुरावा , डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय 

पहिल्यांदाच मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन लावणी सादर करत आहे आणि माझ्या चाहत्यांनी व प्रेक्षकांनी ती पाहावी, यासाठी मी खूप उत्सुक आहे. आत्ताच फार काही सांगू शकत नाही, मात्र मी जे काही सादर करणार आहे, ते प्रेक्षकांसाठी एक नवीन आणि वेगळा अनुभव ठरेल, याची मला खात्री आहे!” ‘लव फिल्म्स’ प्रस्तुत ‘देवमाणूस’, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित, हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

भारीच … आता UPI आणि ATM द्वारे काढता येणार PF चे पैसे, ‘या’ दिवशी मिळणार सुविधा 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube