Download App

Anant-Radhika Pre-Wedding सोहळा ‘या’ आलिशान क्रूझवर होणार; किंमत अन् वैशिष्ट्ये ऐकून व्हाल थक्क!

सेलिब्रेटी असेंट या क्रूझवर अनंत-राधिकाचा प्री वेडिंग सोहळा पार पडणार आहे. या क्रूझची खास वैशिष्ट्ये आणि किंमत ऐकून थक्क व्हाल.

Image Credit: letsupp

Anant-Radhika Pre-Wedding : भारतासह आशियातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत आणि होणारी सून राधिका मर्चंट यांच्या लग्नाची लगबग सध्या सुरू आहे. त्या दोघांच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शनच्या ( Anant-Radhika Pre-Wedding)चर्चेने पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले. या अगोदर पार पडलेलं त्यांचं पहिलं प्री-वेडिंग फंक्शन देखील प्रचंड भव्य आणि न भूतो न भविष्यती अशा प्रकारे पार पडलं होतं. त्यानंतर आता अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचे दुसरे प्री-वेडिंग फंक्शन पहिल्यापेक्षा अधिक धुमधडाक्यात होणार आहे. कारण ते प्री-वेडिंग फंक्शन तब्बल सात हजार कोटी रुपयांच्या लक्झरीअस क्रूजवर होणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी 800 व्हीव्हीआयपी पाहुणे हजेरी लावणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी मोठे बिझनेस असणार आहेत.

मोठी बातमी! विशाल व सुरेंद्र अग्रवाल यांचा तुरुंगात मुक्काम वाढला, ‘इतक्या’ दिवसांची पीसी

हा प्री-वेडिंग सोहळा 28 मे ते 31 मे असा चार दिवस चालणार आहे. त्यात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या थीम असणार आहेत. असून 28 मेला ग्रँड वेलकम, 29 मे ला वेलकम लंच थीम पार्टी आणि तारो वाली रात 30 मेला ए रोमन हॉलिडे तर रात्री ‘ला डोल्से फार निएंटे’ त्यानंतर टोगा पार्टी तर 31 मे या दिवशी हा सोहळा संपन्न होणार आहे.

तसेच या सोहळ्याचं सगळं काही अगदीच खास असणार आहे. सेलिब्रेटी असेंट असं या क्रुझवर हे प्री-वेडिंग होणार असून हे एक अतिशय लक्झरी क्रूझ जहाज आहे. चँटियर्स डी आय’अटलांटिक सेलिब्रिटी नामक कंपनीने हे जहाज बनवले असून त्यासाठी सुमारे 90 कोटी डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. हे क्रूझ 5 स्टार सुविधेसह फ्लोटिंग रिसॉर्ट असून एखाद्या आलिशान राजवाड्यापेक्षा कमी नाही. यामध्ये अनेक सुविधा आहेत. अनंत-राधिकाच्या या दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये पाहुण्यांना इटली आणि दक्षिण फ्रान्स दरम्यानच्या अद्भुत प्रवासाला नेण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रवास सुमारे 4380 किलोमीटरचा असणार आहे.

प्रियकराचा ‘कार’नामा! गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडच्या अंगावरच घातली कार, तरुण जखमी

क्रूझमध्ये जास्तीत जास्त 3950 प्रवासी प्रवास करू शकतात. तर 327 मीटर लांब आणि 39 मीटर रुंद असा क्रूझ जहाजावर 17 डेक आहे. यामध्ये सूर्यास्त बार आणि पूल डेक देखील आहेत. तसेच लॅप पूल, 2 हॉट टब पूल आणि वॉकिंग जॉगिंग ट्रॅकसह रिसॉर्ट डेक देखील आहे. क्रूझच्या पेंटहाऊस सूटमध्ये बेडरूम, ड्रेसिंग रूम, लिव्हिंग एरिया आणि डायनिंग एरियाही बनवण्यात आलायं.

दरम्यान, मिडीया रिपोर्टनुसार 29 मे 2024 पासून ते 1 जून पर्यंत प्री-वेडिंगचा कार्यक्रम चालणार असून हा भव्य कार्यक्रम क्रूझवर होणार आहे. ही क्रूझ इटली आणि फ्रान्स दरम्यान प्रवास करणार आहे. पाहुण्यांच्या यादीत 800 जणांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश असेल.
.

follow us

वेब स्टोरीज