मोठी बातमी! विशाल व सुरेंद्र अग्रवाल यांचा तुरुंगात मुक्काम वाढला, ‘इतक्या’ दिवसांची पीसी

मोठी बातमी! विशाल व सुरेंद्र अग्रवाल यांचा तुरुंगात मुक्काम वाढला, ‘इतक्या’ दिवसांची पीसी

Pune Car Accident : पुण्यातील पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident) प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल (Surendra Agarwal) आणि वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

माहितीनुसार 31 मे पर्यंत दोघांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आरोपी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांना या प्रकरणात कार ड्रायव्हरला धमकी देऊन डांबून ठेवल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

न्यायालयात पोलिसांचा युक्तिवाद काय?

आरोपी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांनी ड्रायव्हरकडून त्याचा फोन घेऊन त्याला धमकी दिली तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींनी छेडछाड केली असल्याने या प्रकरणात अधिक तपासासाठी तसेच या प्रकरणात आरोपींना आणखी कोणी मदत केली आहे का? तसेच आरोपी तपासामध्ये सहकार्य करीत नसल्याने आरोपींची पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी यावेळी पोलिसांनी केली.

या प्रकरणात आरोपी असलेल्या सुरेंद्र अग्रवाल यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात कलम 438,420,464,565,467,468 आणि 34अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

‘डॉ. तावरे एक कर्तव्यदक्ष अधिकारी..,’; ससूनमध्ये चिखल करणारं आमदार सुनील टिंगरेंचं ‘ते’ पत्र व्हायरल

तर विशाल अग्रवाल यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात कलम 304, 304 अ, 337,338,427 मो.वा.का. कलम 119,184,187 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

प्रकरण काय

19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात त्याला सुरुवातील अवघ्या एका दिवसात जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज