Aparshakti Khurana: अपारशक्ती खुराणा (Aparshakti Khurana) यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर (social media) मनोरंजन (entertainment) उद्योगातील खुराणा बंधूंच्या प्रवासाची सुरुवात करून एक नॉस्टॅल्जिक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्याचा भाऊ आयुष्मान खुराना आणि तो दिसतोय हा व्हिडिओ नक्की काय आहे ? या मागचं कारण काय हे यातून दिसतंय.
अपारशक्ती खुराणा याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करून खास कॅप्शन दिले आहे. “तेथूनच हे सर्व सुरू झाले आहे. आतापर्यंतचा प्रवास पाहता खूप धन्य वाटतं. आमच्या चेहऱ्यांकडे बघून काय बोलावे तेच कळत नाही. अपारशक्ती खुराणा आणि त्याचा भावाच्या गायनाच्या ऑडिशनने त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्व दाखवलं आहे. या पोस्टमुळे चाहत्यांना त्यांच्या बॉलीवूडच्या (Bollywood) प्रवासाची झलक दिसते.
व्यावसायिक आघाडीवर अपारशक्तीचे स्त्री 2; अॅप्लॉज एंटरटेनमेंटद्वारे फाइंडिंग राम हा बायोपिक आणि कबीर बेदी इश्वाक सिंग आणि राहुल बोस यांचा समावेश असलेला अतुल सबरवाल दिग्दर्शित आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध बर्लिन देखील येणार आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्यांच्या अतुल साबेरवाल दिग्दर्शित ‘बर्लिन’ या चित्रपटाने प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये धुमाकूळ घातला. ऑक्टोबर 2023 मध्ये लॉस एंजेलिसच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला आणि 67 व्या BFI लंडन फिल्म फेस्टिव्हल आणि Jio MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्येही तो प्रदर्शित करण्यात आला. त्याच्या उत्तम कथानकासाठी आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी या चित्रपटाने भरपूर प्रशंसा मिळवली. अपारशक्तीच्या सोबतीने बर्लिनमध्ये राहुल बोस, कबीर बेदी आणि इश्वाक सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
Fighter: हृतिक रोशन अन् अनिल कपूर यांनी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना सादर केली #थँक्यूफायटर पत्रे!
अपारशक्ती खुराणा याने यंदाच वर्ष त्याच्या कामाने याद गार तर केलंच. पण त्याने खूप कौतुक देखील मिळवलं. 2024 मध्ये तो अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स करणार आहे. सोबतीला सगळेच बर्लिनच्या रिलीजची वाट पाहत आहेत. अपारशक्ती स्त्री 2 मध्ये पुन्हा झळकला हे आणि अॅपलॉज एंटरटेनमेंटचा ‘फाइंडिंग राम’ ही डॉक्युमेंटरी तो करणार आहे.