Aparshakti Khurana: अपारशक्ती खुरानाच्या ‘बर्लिन’ने MAMI प्रीमियरमध्ये जिंकली प्रेक्षकांची मनं

Aparshakti Khurana: अपारशक्ती खुरानाच्या ‘बर्लिन’ने MAMI प्रीमियरमध्ये जिंकली प्रेक्षकांची मनं

Aparshakti Khurana Berlin To Premiere: आपल्या विनोदी अभिनयाने चाहत्यांचे नेहमी मने जिंकून घेणारा अभिनेता (Aparshakti Khurana) म्हणून बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अपारशक्ती खुरानाला ओळखले जात असते. बाला, स्त्री, बद्रीनाथ की दुल्हनिया, दंगल, लुका-छुपी, जबरिया जोडी इत्यादी सिनेमात त्याने सहाय्यक कलाकार म्हणून काम केल्याचे बघायला मिळाले आहे. त्याच्या या सर्व भूमिका कायम विनोदी असतात. अपारशक्ती खुराणा आता ‘बर्लिन’ (Berlin Movie) चित्रपटात साकारलेल्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aparshakti Khurana (@aparshakti_khurana)


टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये (Oronto International Film Festival) प्रीमियर झाल्यानंतर हा चित्रपट लॉस एंजेलिस 2023 च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला. आता MAMI 2023 च्या प्रीमियरमध्ये अपारशक्तीचे त्याच्या कलेबद्दलचे समर्पण आणि कोणत्याही पात्राला स्वतःमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता दर्शविली आहे. “बर्लिन” मधील त्याच्या अभिनयाने त्याच्या पात्रांना जिवंत केलं त्यांच्या कथांमध्ये स्वतःला मग्न करण्यासाठी आणि क्रेडिट रोलनंतर खूप काळ टिकून राहिलेला परफॉर्मन्स देण्यासाठी त्याने मेहनत घेतली आहे.

तसेच तो नेहमीच त्याच्या अनोख्या अभिनय कौशल्यासाठी ओळखला जात असतो. त्याने नेहमीच हटक्या भूमिकांनी आपल्या अभिनायची जादू ही अलीकडे शिकागो येथील दक्षिण आशियाई चित्रपट इन अमेरिका (SAFA) मध्ये बघायला मिळाली आहे, आणि त्याला खास पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. प्रत्येक भूमिका अनोख्या पद्धतीने साकारून त्यांना जिवंत करण्याचे काम अपारशक्तीच्या अभिनयातून दिसून देत असते.

Ankita Lokhande: बिग बॉस 17च्या घरात अंकिता लोखंडेने तिच्या करिअरबद्दल सांगितली खास गोष्ट

अपारशक्ती खुरानाच्या “बर्लिन” मधील उल्लेखनीय कामगिरीच कौतुक सध्या सर्वत्र केलं जात आहे. “ज्युबिली” या वेब सिरीजचे लेखक अतुल सबरवाल दिग्दर्शित, ‘बर्लिन’मध्ये इश्वाक सिंग, राहुल बोस आणि कबीर बेदी देखील मुख्य भूमिकेत आहेत. “बर्लिन” व्यतिरिक्त, अपारशक्ती “स्त्री 2” मधील बिट्टूच्या भूमिकेची पुनरावृत्ती करून आणि अॅप्लाज एंटरटेनमेंटच्या सहकार्याने “फाइंडिंग राम” या सिनेमात देखील अनोख्या अंदाजात चाहत्यांना बघायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube