Download App

एका लाडक्या बहिणीने भावाची इज्जत तारली, तर दुसरीने वेशीवर टांगली ; घनश्यामचा निक्कीला टोला

  • Written By: Last Updated:

Ghanshyam Darode Reaction After Nikki Tamboli Not Attending His Birthday : नुकताच मराठी रिअॅलिटी शो बिग बॉस (Bigg Boss) पार पडलाय. हा बिग बॉसचा पाचवा सिझन होता. या सिझनमध्ये अनेक स्पर्धक चर्चेत राहिले. यापैकीच एक म्हणजे घनश्याम दरोडे. नुकताच घनश्याम दरोडे याचा वाढदिवस पार पडलाय. त्यानंतर घनश्याम (Ghanshyam Darode) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ती जास्त चर्चेत राहिली. याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने घनश्याम दरोडेसोबत संवाद साधलाय.

यावेळी लेट्सअप मराठीसोबत बोलताना घनश्याम दरोडे म्हणाला की, माझा नुकताच 25 डिसेंबर रोजी वाढदिवस पार पडलाय. पीडीदादा, अंकिता, वर्षाताई या बिग बॉसमधील सर्वांना मी निमंत्रण दिलं होतं. पण वर्षाताईंची तब्येत खराब होती, त्यामुळे त्या येवू शकले नाही. निकुताईला (Nikki Tamboli) देखील निमंत्रण दिलं होतं. पण त्यामधील फक्त जान्वीताई किल्लेकर आल्या होत्या, असं घनश्याम म्हणाला. लेट्सअप मराठीच्या माध्यमातून त्यांनी जान्वीताई अन् पुरूषोत्तम दादांचे आभार मानले आहेत.

Sadabhau Khot : ‘देवाभाऊंच्या काठीलाही आवाज नाही…’; बीडच्या घटनेवर खोत काय म्हणाले?

घनश्याम निकीसोबतच्या नात्यावर बोलताना म्हणाला की, तसं धोका म्हणता येणार नाही. पण निकुताईंचं भावावरचं प्रेम स्पष्टपणे दिसलं. जान्वीताई एक्या फोनमध्ये आली, अन् निकुताईला १०-१० फोन केले बड्डेला न आल्याने चाहतावर्ग नाराज झालाय. आता चाहतेवर्ग निकुताई कुठेय? असं विचारत आहे. निकुताई नुसतं प्रेमाचे बंधन सांगतात, असं दिसत आहेत. मी शब्दाचा पक्का माणूस आहे. भावाच्या वाढदिवसाला जाणुनबूजून नाही आली, असं दिसत आहे. आपण एवढी मोठी सेलिब्रेटी आहे, तर घनश्यामच्या बड्डेला का जायचं? असं निक्कीला वाटत असेल, असं घनश्याम म्हणाला आहे.

बड्डेला आली नाही म्हणून माझा तिच्यावर राग नाही. पण आज चाहतेवर्गाला कळलंय की, निकुताई फक्त माणसं बघून नातं जपते. मी त्यांना पुढे संपर्क करणार नाही. पुढील कोणत्याही कार्यक्रम असेल निकुताई आणि अरबाजला निमंत्रण देणार नाही, असं देखील घनश्याम दरोडे म्हणाला. ती पुढे माझ्या लाईफमधून बॅन झालीय. पण जेव्हा-केव्हा भाऊ म्हणून आवाज देईल, तेव्हा हा घनश्याम दरोडे निकुताईचा भाऊ म्हणून खंबीरपणे उभा राहील.

Bank Holidays January 2025: जानेवारीत 15 दिवस बँका राहणार बंद, ‘हे’ आहे कारण

माझ्या एका लाडक्या बहिणीने भावाची इज्जत तारली, तर दुसरीने वेशीवर टांगली, असा टोला देखील घनश्यामने निक्की तांबोळीला मारला आहे. संपू्र्ण महाराष्ट्रातून फोन येत आहे की, निक्की तुमच्या वाढदिवसाला का आली नाही? सूरजला देखील निमंत्रण दिलं होतं. पण सूरजला स्वत:चा अधिकार घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे माझा त्याच्यावर राग नाही, असं देखील घनश्याम दरोडेनी सांगितलं आहे.

 

follow us