Download App

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नवी जोडी पाहिलीत का?

Bigg Boss Marathi New Season Day 30 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन (Bigg Boss Marathi New Season) सुरू होऊन बघता बघता एक महिना पूर्ण झाला आहे.

Bigg Boss Marathi New Season Day 30 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन (Bigg Boss Marathi New Season) सुरू होऊन बघता बघता एक महिना पूर्ण झाला आहे. (Bigg Boss Marathi) गेले महिनाभर ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील निक्की (Nikki Tamboli) आणि अरबाजची मैत्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली. पण भाऊच्या चक्रव्यूहात गेल्यावर निक्कीसमोर सत्य आलं आहे. सत्य समोर आल्यानंतर निक्की आणि अरबाजमध्ये चांगलाच दुरावा आला आहे. निक्की एकटी खेळेल असं वाटत असताना तिने अभिजीतसोबत (Abhijeet Sawant) हातमिळवणी केलेली आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.


‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की आणि अभिजीत गप्पा मारताना दिसत आहेत. दरम्यान बिग बॉस म्हणतात,”अभिजीत जोडीत बांधले गेले आहात. या परिस्थितीवर कोणतं गाणं सुचतयं?”. त्यावर अभिजीत म्हणतो,”हम दोनो”. त्यानंतर घरात एकच हशा पिकतो. अभिजीतच्या गाण्यानंतर अंकिता म्हणते,”आज कळलं आम्हाला जोड्या बिग बॉसच्या घरात बांधलेल्या असतात”. त्यावर अभिजीत ‘कुछ तू लोग कहेंगे’ हे गाणं म्हणतो. बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूपच कमाल असणार आहे. घरातील सदस्य घाबरलेले असताना दुसरीकडे निक्की आणि अभिजीत सदस्यांना चांगलच हसवणार आहेत.

अंकिता आणि DP दादामध्ये सुरू झाले शाब्दिक बाचाबाची

बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) घरात कालच भाऊचा धक्का पार पडला. रितेश भाऊच्या सांगन्याने घरातल्या सदस्यानंवर किती फरक पडतो हे पाहाणे महत्त्वाचे ठरले. ‘बिग बॉस मराठी’चा नुकताच नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

Bigg Boss Marathi: अंकिता आणि DP दादामध्ये सुरू झाले शाब्दिक बाचाबाची

या प्रोमोत आपण पाहू शकतो की, टीम’ B ‘मधील अंकिता ही DP दादांना विचाराते की, “तुम्ही निक्किला जाऊन विचारले की, आर्या काय बोलली तुला तर.. तुम्ही ते का विचारले कारण निक्की मला येऊन म्हणाली की मागून का विचारत आहेत जे काय असेल ते समोरासमोर येऊन विचारा.” असे अंकिता DP दादांना म्हणाली त्यावर ते बोलले की, “माझी मर्जी.. मी काय मागून नाही विचारले. त्या दोघी खूप वेळ बोलत बसल्या होत्या. जे की, कधी बसत नाही. मला विचारावस वाटले म्हणून मी विचारले की, काय एवढं बोलने सुरू आहे. आता घरात मी अशी काय चर्चा करायची कोणाशी बोलायाचे नाही का.?”.DP दादा आणि अंकिता यांच्या मधील वाद संपेल का.? की याचे रुपांतर भांडणात होईल. पाहा आजच्या भागात बघायला मिळणार आहे.

 

follow us