Download App

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’चा ‘हा’ सीझन ठरलाय ब्लॉकबस्टर; सदस्यांना मिळणार मोठा धक्का

Bigg Boss Marathi Season 5 Day 58 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू (Bigg Boss Marathi Season) होऊन आठ आठवडे पूर्ण झाले आहेत.

Bigg Boss Marathi Season 5 Day 58 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू (Bigg Boss Marathi Season) होऊन आठ आठवडे पूर्ण झाले आहेत. (Bigg Boss Marathi ) सीझनने नवव्या आठवड्यात प्रवेश केला आहे. गेले 57 दिवस सर्वच सदस्य प्रेक्षकांचं फुल ऑन मनोरंजन करत आहेत. आजच्या भागात ‘बिग बॉस’ घरातील सदस्यांसोबत संवाद साधताना दिसून येतील.


समोर आलेल्या प्रोमोमध्ये, (Bigg Boss Marathi New Promo) ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील आठही सदस्य गार्डन एरियामध्ये जमलेले दिसत आहेत. (BhauCha Dhakka) दरम्यान ‘बिग बॉस’ म्हणत आहेत, हा सीझन खऱ्या अर्थाने ठरला ब्लॉकबस्टर सीझन”. (Arbaz Patel) त्यानंतर घरातील सर्व सदस्य ‘भाऊचा धक्का’ या सुपरहिट गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’ पुढे म्हणत आहेत,”…आणि आता मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे”. ‘बिग बॉस’ आज काय महत्त्वाची घोषणा करणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या घोषणेनंतर सदस्यांना सुखद धक्का बसणार की त्यांचे चक्र फिरणार हे जाणून घेण्यासाठी आजचा विशेष भाग पाहायला विसरू नका.

घरातील अरबाज पटेलचा प्रवास संपला

‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा रिअॅलिटी शोचा स्टार, स्प्लिट्सविलाची जान म्हणजेच अरबाज पटेल सहभागी झाला होता. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अरबाजने आपल्या स्टाईल आणि स्वॅगने चाहत्यांना घायाळ केलं. जिगरबाज तरुणाने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चांगलाच धुमाकूळ घालता होता. निक्की आणि त्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातला त्याचा प्रवास संपला आहे.

Bigg Boss Marathi: अशा बॉडीचा उपयोग काय? नेटकऱ्यांनी संग्रामला सुनावलं

‘बिग बॉस मराठी’च्या या आठवड्यात (Bigg Boss Marathi New Promo) अरबाज घराबाहेर पडल्याने निक्कीसह (Nikki Tamboli) सर्व सदस्यांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातल्या या चॉकलेट बॉय अरबाजने ताकदीच्या जोरावर अनेक टास्क जिंकले. या आठवड्याचा तो कॅप्टनदेखील होता.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून प्रत्येक आठवड्याला कोणाला ना कोणाला बाहेर पडावं लागतं. अरबाजने त्याच्या पद्धतीने चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून निरोप घेताना अरबाज म्हणाला,”महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मला आपलंसं केलं आहे. माझा प्रवास त्यांनी पाहिला आहे. या खेळात माझं काही चुकलं असं मला वाटलं नाही. निक्कीसोबतची जर्नी खूप छान होती”.

follow us