Bigg Boss Marathi : घरात कॅप्टनसीचा टास्क रंगणार; कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार?

Bigg Boss Marathi : घरात कॅप्टनसीचा टास्क रंगणार; कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार?

Bigg Boss Marathi Season 5 Day 55 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात सतत कोणा ना कोणामध्ये वाद होत असतात. (Bigg Boss Marathi ) घरात आता खेळाला रंग चढू लागला आहे. आठव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी (Captaincy Task) कार्य पार पडणार आहे. (Video Viral ) या कॅप्टनसी कार्यात कोण जिंकणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार हे पाहताना प्रेक्षकांना मात्र येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टनसी पदासाठी भागवावी लागणार सर्व प्राण्यांची तहान. दरम्यान प्रोमोमध्ये वर्षा ताई म्हणत आहेत,”आपली तहान भागवा”. अरबाज म्हणतोय, “हे खूप गोड पाणी आहे”. अरबाजला निक्की विचारतेय, “कालपासून तू इतका गोड होतास…अचानक तुझं पाणी गोड कसं झालं?”. पॅडी दादा वर्षा ताईंना विचारत आहेत,”आ म्ही पाणी पिऊ यावर तुमचा विश्वास होता का?”. त्यावर वर्षा ताई “हो असं वाटलं होतं”, असं उत्तर देतात. पुढे पॅडी दादा वर्षा ताईंना स्पष्टच म्हणतात,”स्टॅटर्जी करताना तुम्ही त्यांच्यासोबत बसणार आणि आमच्यावर विश्वास ठेवणार”.

पॅडीसाठी लावली आहे जोरात स्टॅटर्जी

बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात सदस्य खूप जीव ओतून टास्क खेळताना दिसत आहेत. त्यांचा हा टास्क पाहताना प्रेक्षकांनादेखील मजा येणार आहे. सर्वच सदस्य कमालीचा टास्क खेळताना दिसून येतील. यात पॅडी दादांचा काय गेम प्लॅन असेल याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. प्रोमोमध्ये डीपी दादा म्हणत आहेत,”या गटातला आम्हाला पॅडी हवाय”. दरम्यान जान्हवी पॅडी दादांना म्हणतेय,”तो त्याची स्टॅटर्जी चेंज करणार नाही”. पुढे घरातील सर्वच सदस्य धक्काबुक्की करताना दिसत आहे. तसेच प्रोमोमध्ये शेवटी संग्राम खूप दूर फेकला गेल्याचं दिसत आहे.

Bigg Boss Marathi: घरात कोणाला समजणार अंड्याचा फंडा, अरबाज आणि निक्कीमध्ये होणार का राडा?

अंकिताने घेतली सूरजची शाळा

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अंकिता सूरजची शाळा घेताना दिसणार आहे. अंकिता सूरजला म्हणतेय,”मला सांगू नका कसं बोलायचंय हे असं बोलणं बरोबर आहे का?”. सूरज म्हणतोय,”मी असं कधी बोलत नाही. कधी मध्ये-मध्ये करत नाही”. अंकिता सूरजला सांगते,”कधीही जे काही असेल ते नीट सांगायचं”.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube