Bigg Boss Marathi: घरातील सदस्यांची जेवणासाठी उडणार धांडल; सदस्यांना वेळेवर जेवण मिळणार?

Bigg Boss Marathi: घरातील सदस्यांची जेवणासाठी उडणार धांडल; सदस्यांना वेळेवर जेवण मिळणार?

Bigg Boss Marathi Season 5 Day 53 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच नव-नवा ट्विस्ट येत असतो. (Bigg Boss Marathi Season 5) घरात दररोज काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. (Bigg Boss Marathi ) घरात सध्या जंगल राग सुरू आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना जेवणासाठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान वर्षा ताई (Varsha Gavaskar) आणि अरबाज (Arbaz Patel) यांचं वाजणार आहे. सर्व सदस्यांची धांडल उडणार आहे. (Bigg Boss Marathi New Promo) त्यामुळे घरातील सदस्यांना वेळेवर जेवण मिळणार का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये, डीपी दादा भांडी वाजवत ‘बिग बॉस’ला गॅस सुरू करण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर अंकिता गॅस सुरू करताना दिसत आहे. घड्याळ लावून घरातील काही सदस्य जेवण बनवताना दिसत आहेत. नंतर अरबाज म्हणतोय, ‘बिग बॉस’ गॅस बंद करा’. पुढे वर्षा ताई म्हणत आहेत, “राईचा पर्वत करायचाय उगाच”. अरबाज पुढे म्हणतोय, “फेकलं गरम पाणी तिकडे जाऊन”.

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात डीपी दादा अभिजीतला म्हणत आहे, “हत्ती आणि गेंडा तू कधी पट्टापट्ट्याचा बघितला आहेस?”. त्यावर अभिजीत उत्तर देतो, “मी अंदाज बांधत होतो”. दरम्यान बिग बॉस अभिजीतला म्हणतात, “अभिजीत एक प्रश्न पडलाय. आपण व्हेज आहात की नॉन-व्हेज?”. शेवटी जान्हवी म्हणतेय, “काकाकुवा हा प्राणी मी शेवटपर्यंत विसरणार नाही’.

Bigg Boss Marathi : ‘दम असेल तर तोंडावर बोल’, निक्कीचं संग्रामला खुलं चॅलेंज

पाणगेंडा ओळखताना सूरजची झाली दमछाक

आजच्या भागात पाणगेंडा ओळखताना सूरजची दमछाक झालेली पाहायला मिळेल. त्यामुळे घरात एकच कल्ला होईल. ‘बिग बॉस मराठी’चा आगामी भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये, अंकिता सूरजला पाणगेंड्याची अॅक्टिंग करुन दाखवत आहे. तर सूरजला ती कोणत्या प्राण्याची अॅक्टिंग करतेय हे ओळखायचं आहे. सूरजने गेंडा बरोबर ओळखला आहे. पण पाणगेंडा ओळखण्यात त्यांची झालेली पंजायत पाहून प्रेक्षकांना मात्र मजा येईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube