Download App

BJP Candidates List 2024 मध्ये भोजपुरी स्टार्सचा बोलबाला; पाहा कुणा-कुणाला मिळाली संधी?

BJP Candidates List 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) भाजपने 195 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये चार भोजपुरी स्टार्सना ( Bhojpuri Stars ) संधी देण्यात आली आहे. त्यात मनोज तिवारी, रविकिशन शुक्ला, दिनेश लाल निरहुआ आणि पवन सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

Loksabha : उमेदवारी मिळताच कृपाशंकर सिंहांची कॉग्रेस आणि ठाकरेंवर टीका, ‘अडीच दिवस मंत्रालयात..’

भाजपने नॉर्थ ईस्ट दिल्लीतून मनोज तिवारी, युपीतील गोरखपूरमधून रविकिशन शुक्ला, आझमगढधून दिनेश लाल निरहुआ यांना उमेदवारी दिली आहे. तर पवन सिंह यांना पश्चिम बंगालच्या आसनसोल येथून उमेदवारी देण्यात आली होती. कारण त्यांना बिहारमधून उमेदवारी हवी होती. तर यामागे पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी यांची स्थिती मजबूत असणे हे एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणून त्यांनी 24 तासांच्या आत निवडणुक लढण्यास नकार दिला आहे.

Pawan Singh Asansol : गौतम गंभीर नंतर ‘या’ गायकाचा भाजपकडून तिकीट मिळूनही निवडणूक लढण्यास नकार

या भोजपुरी स्टार्सबद्दल सांगायचं झालं तर रविकिशन शुक्ला यांना भोजपुरी चित्रपटसृष्टीचे अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जाते. भोजपुरीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. 2019 ला देखील ते युपीतील गोरखपूरमधून भाजपचे खासदार होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना संधी मिळाली आहे.

Genelia Deshmukh : जेनेलियाचं ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट, वेड लावणाऱ्या लूकवर चाहते फिदा

मनोज तिवारी हे देखील एक मोठे अभिनेते आणि गायक आहेत. त्यांना पुन्हा एकदा भाजपकडून दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर पूर्व भागाचे तिकीट त्यांना देण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून ते याच मतदारसंघातून भाजपचे लोकसभा सदस्य आहेत.

‘वंचित’बरोबर आघाडी होणार? वडेट्टीवार म्हणाले, आता दोन दिवसांत तिन्ही पक्ष…

तर दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यांना देखील भाजपकडून सलग तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. भोजपुरी चित्रपट सृष्टीमध्ये मुख्य चेहरा असणारे निरहुआ यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देखील आजमगड याच मतदारसंघातून संधी देण्यात आली होती. मात्र त्यावेळी उत्तर प्रदेशची माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून त्यांना पराभूत करण्यात आले होते.

भोजपुरी गायक पवन सिंह यांनी मात्र भाजपकडून तिकीट मिळून देखील निवडणुक लढण्यास नकार दिला आहे. याचं कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही. ते म्हणाले की, भाजपच्या वरिष्ठांचे मनापासून आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला. मात्र काही कारणास्तव मी आसनसोल या ठिकाणाहून निवडणूक लढू शकत नाही. असं ट्विट त्यांनी केलं आहे.

follow us

वेब स्टोरीज