Loksabha : उमेदवारी मिळताच कृपाशंकर सिंहांची कॉग्रेस आणि ठाकरेंवर टीका, ‘अडीच दिवस मंत्रालयात..’
Kripa Shankar Singh : काल लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ५१ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पहिल्या यादीत मुंबई काँग्रेस सोडून भाजपमध्ये (BJP) दाखल झालेले कृपाशंकर सिंह (Kripa Shankar Singh) यांना जौनपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकाही केली.
Pawan Singh Asansol : गौतम गंभीर नंतर ‘या’ गायकाचा भाजपकडून तिकीट मिळूनही निवडणूक लढण्यास नकार
लेट्सअप मराठीशी बोलतांना कृपाशंकर सिंह म्हणाले की, भाजपने जेव्हा कलम ३७० हटवण्याचं विधेयक संसदेत मांडलं, त्यावेळी कॉंग्रेसने विरोध केला. मात्र, भाजप देशहिताचा विचार करत आहे. ३७० विरोध करून चालणार नाही, असं ही माझी भूमिका कॉंग्रसला सांगितली. मात्र, कॉंग्रेसनं आपल्या भूमिकेवर ठाम राहिली, त्यांनी ३७० ला विरोध केल्यानं कॉंग्रेस सोडली. त्यानंतर जवळपास २० महिने कुठलाच पक्षात गेलो नाही. मात्र, २०२१ ला भाजपात प्रवेश केला आणि आता भाजपने उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास टाकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा विश्वास सार्थकी लावणार, मोदींनी ४०० चा नारा दिलाय, त्यात ४०० जागांमध्ये जौनपूरची जागा असेल, असा विश्वास कृपाशंकर सिंह यांनी केला.
पुढं बोलतांना ते म्हणाले की, मी दिग्गज नेता नाही तर दिग्गज कार्यकर्ता आहे. आणि या कार्यकर्त्यावर भाजपने विश्वास टाकल्याबद्दल मी आभारी आहे. जौनपूर हे माझं गाव आहे. माझा जन्म आणि शिक्षण तिकडे झाला. माझ्या उमेदवारीचा माझी माणसं नक्कीच सन्मान करतील आणि मला विजयी करतील. सरकारने केलेली काम जौनपूरवाशीयांपर्यंत पोहोचणवार आणि त्यांच्या समस्या सरकार दरबारी घेऊन जाणार, असं कृपाशंकर सिंह म्हणाले.
Genelia Deshmukh : जेनेलियाचं ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट, वेड लावणाऱ्या लूकवर चाहते फिदा
ठाकरे फक्त अडीच दिवस मंत्रालयात
पहिल्या यादीत नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली नाही. मात्र, कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी मिळाल्यानं उद्धव ठाकरेंसह विरोधकांनी भाजपवर टीका केली. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच भाजपने उमेदवारी दिल्याची टीका ठाकरेंनी केली. त्यावरही कृपाशंकर सिंह यांनी भाष्य केलं. आधीचे मुख्यमंत्री फक्त अडीच दिवस मंत्रालयात गेले. त्यांनी राज्याची वाट लावली. विरोधी पक्ष म्हणून आता ते काहीही बोलत आहेत. पण, ही पब्लिक है और ये सब जानती है, असं कृपाशंकर सिंह म्हणाले.
कृपाशंकर सिंह हे उत्तर प्रदेशचे रहिवासी असले तरी त्यांची राजकीय जडणघडण मुंबईत झाली. महाराष्ट्राच्या काँग्रेस सरकारमध्ये ते राज्य गृहमंत्री होते. उत्तर प्रदेशातील जौनपूर हे मुळ गाव आहे.
कृपाशंकर सिंह यांचा मुंबई आणि पूर्व उत्तर प्रदेशात राहणाऱ्या उत्तर भारतीयांमध्ये विशेष प्रभाव आहे. त्यामुळंच त्यांनी जौनपूर येथून उमेदावारी देण्यात आली.