Download App

ॲनिमलनंतर बॉबी देओल ‘आश्रम 4’ मधून करणार धमाका; रिलीज डेटबाबत समोर आली अपडेट

Bobby Deol On Ashram 4: बॉबी देओल (Bobby Deol) ‘अनिमल’मध्ये (Animal Movie) अबरारची भूमिका साकारून सर्वत्र प्रसिद्ध झाला. आता सर्वत्र लॉर्ड बॉबीचे नाव जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियापासून (social media) ते अनेक लोकांच्या हृदयावर आणि मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले आहे. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. खरं तर ही बातमी त्याच्या ‘आश्रम 4’ (Ashram 4) या वेब सीरिजशी संबंधित आहे. या मालिकेचा पुढचा सीझन लवकरच येणार आहे. हे आम्ही म्हणत नसून खुद्द त्याच्या सहकलाकाराने याबद्दल माहिती दिली.

‘आश्रम’चे आतापर्यंत तीन हंगाम आले आहेत. चौथ्या सीझनची सर्वांनाच खूप प्रतीक्षा आहे. ‘बाबा निराला’ पुन्हा कधी पाहायला मिळणार हे लोकांना पुन्हा एकदा जाणून घ्यायचे आहे. या प्रश्नाचे उत्तर मालिकेतील सहकलाकार अभिनेता चंदन रॉय याने दिला आहे.

एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले आहे की, “प्रत्येकजण सारखे प्रश्न विचारत आहे. मला वाटतं ते या वर्षी यायला हवं. तयारी पूर्ण झाली आहे. थोडा भाग शूटिंगसाठी बाकी आहे आणि काही स्क्रिप्टिंग बाकी आहे. मात्र, ‘आश्रम 4’ची अद्याप निर्मात्यांनी घोषणा केलेली नाही. आता निर्माते कधी घोषणा करणार आणि बाबा निराला त्यांच्या चाहत्यांमध्ये कधी परतणार हे पाहणे बाकी ठरणार आहे.

Virat Kohli : सामना जिंकताच विराटचा थेट अनुष्काला व्हिडीओ कॉल; मुलांना दिले फ्लाइंग किस

या चित्रपटात बॉबी देओल दिसणार

या वर्षी बॉबी देओलही एका साऊथ सिनेमात दिसणार आहे. तो चित्रपट म्हणजे सुपरस्टार सूर्याचा ‘कांगुवा’, जो एका मोठ्या लेव्हलचा चित्रपट असणार आहे. हा सिनेमा 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा बजेट सुमारे 300 कोटी असणार आहे. या चित्रपटात बॉबीशिवाय बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी देखील आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा यावर्षीच चित्रपटगृहात दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही.

follow us

वेब स्टोरीज