Diwali Party 2023 : अमृतपाल सिंगच्या दिवाळी पार्टीत किंग खानची रॉयल एन्ट्री, सुहानानं वेधल्या नजरा

Diwali Party 2023 : दिवाळीचा (Diwali 2023)उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. फिल्मी दुनियेत (Film Industry)पार्टी आणि सेलिब्रेशनची प्रक्रिया सुरु असते. मनीष मल्होत्रा, रमेश तौरानी आणि सारा अली खान यांच्यानंतर आता निर्माता अमृतपाल सिंग बिंद्रा यांनी दिवाळी पार्टी आयोजित केली होती, त्या पार्टीत सिने इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सनं आपली उपस्थिती दर्शवली. बॉलिवूड किंग शाहरुख खान (Shah Rukh […]

Shahrukh Khan Suhana Khan

Shahrukh Khan Suhana Khan

Diwali Party 2023 : दिवाळीचा (Diwali 2023)उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. फिल्मी दुनियेत (Film Industry)पार्टी आणि सेलिब्रेशनची प्रक्रिया सुरु असते. मनीष मल्होत्रा, रमेश तौरानी आणि सारा अली खान यांच्यानंतर आता निर्माता अमृतपाल सिंग बिंद्रा यांनी दिवाळी पार्टी आयोजित केली होती, त्या पार्टीत सिने इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सनं आपली उपस्थिती दर्शवली. बॉलिवूड किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan)आणि त्याची लाडकी लेक सुहानाही (Suhana Khan)या पार्टीत सहभागी झाली होती. शाहरुख खानने शाही शैलीत पार्टीत प्रवेश केला. तर सुहानाने तिच्या लूकने सर्वांच्या नजरा आपल्याकडे खेचून घेतल्या.

अमृतपाल सिंग यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये किंग खान आपल्या सिग्नेचर स्टाईलमध्ये पोहोचला. शाहरुख त्याच्या आलिशान पांढऱ्या रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅजमध्ये पार्टीत ग्रॅण्ड एन्ट्री केली. त्यावेळी शाहरुख खान फोटोग्राफर्सपासून चेहरा लपवताना पाहायला मिळाला. पण, सर्वांच्या नजरा त्याच्या एन्ट्रीकडे खिळल्या होत्या.

कोल्हापुरात शरद पवार, फडणवीस येणार एकाच मंचावर, जरांगे पाटीलही घेणार त्याच दिवशी सभा

शाहरुख खानसोबतच त्याची मुलगी सुहाना खान देखील या पार्टीची शान बनली. सुहाना तिच्या स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखली जाते. या पार्टीतही तीची वेगळीच स्टाईल पाहायला मिळाली. सुहाना गोल्डन नेटच्या साडीत पार्टीत पोहोचली. सुहानाने मॅचिंग गोल्डन एम्बिलेटेड ब्लाउजसह साडी घातली आणि ओसरी मेकअप, फ्री हेअरस्टाइल आणि स्टेटमेंट डायमंड स्टडसह तिचा लूक हटके दिसून आला.

Diwali Gold Purchase : दिवाळीत सोनं खरेदी करताय? जरा थांबा! सोनं खरं की खोटं असं ओळखा

किंग खानची मुलगी सुहाना ‘द आर्चिज’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. डिसेंबरमध्ये हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी शाहरुख खान त्याच्या आगामी ‘डिंकी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे, तो पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version