Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या चाहत्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, VIDEO समोर

  • Written By: Published:
Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या चाहत्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, VIDEO समोर

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज वाढदिवस आहे. आपल्या 58 व्या वाढदिवसानिमित्त शाहरुख खानने ‘मन्नत’च्या बाल्कनीत येऊन चाहत्यांची भेट घेतली. यावेळी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मनोज जरांगेंचा एकच प्रश्न अन् धनंजय मुंडे निरुत्तर! चर्चेत वंशावळीवरुन नेमकं काय घडलं? 

दरम्यान, शाहरुख वाढदिवसानिमित्त मुंबईच्या रस्त्यांवर ड्राईव्हसाठी गेला होता. यावेळी त्याचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते. किंग खानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी शाहरुखच्या गाडीला समोरून आणि मागून घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पण, यावेळी पोलिसांनी या उत्साही चाहत्यांना लाठीचा प्रसाद दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खानचा ताफा रस्त्यावरून निघताना दिसत आहे, त्याचवेळी रस्त्यावर उपस्थित असलेले अनेक चाहते शाहरुख खानच्या ताफ्यासमोर येऊ लागले. हे चाहते शाहरुखची गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, पोलिसांनी चाहत्यांवर लाठीचार्ज सुरू केला. पोलिसांचा लाठीमार होताच चाहते सैरावैरा पळू लागले.

शाहरूखने दिला फ्लाईंग किस
सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शाहरुख त्याच्या कारमधून बाहेर पडताना आणि चाहत्यांना अभिवादन करताना दिसत आहे. पांढरा टी-शर्ट आणि गॉगल घातलेला किंग खान त्याच्या चाहत्यांना फ्लाइंग किस देखील देतो.

सहानाने केले फोटो शेअर
शाहरुखची मुलगी सुहाना खाननेही शाहरुखला खास शुभेच्छा दिल्या. सुहानाने शाहरुखसोबतचे अनसीन फोटो शेअर केले आहेत. आयपीएल सामन्यादरम्यानचा तिने शेअर केला. यात ती शाहरुखला मिठी मारताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये सुहानाने शाहरुख खान आणि तिचा भाऊ आर्यनसोबतचे काही बालपणीचे फोटो शेअर केले आहेत.

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याचा जवान हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय त्याच्या आगामी डिंकी या चित्रपटाचा छोटा टीझरही रिलीज करण्यात आला आहे. डिंकी ख्रिसमलला जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

https://www.instagram.com/reel/CzIKWUko6HM/?utm_source=ig_embed&ig_rid=3769ade4-9fd4-4c55-93c4-1fb86c4fca69

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube