‘ही लढाई संपलेली नाही, हा विजय नाही…’; हिंदीसक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर हेमंत ढोमेची पोस्ट

शासनाने तुर्तास जीआर रद्द करण्याची घोषणा केलीय. पण ही लढाई संपलेली नाही. मराठी भाषेवर आलेल्या या संकटाशी आता दोन हात करण्याची वेळ आली आहे.

Hemant Dhome

Hemant Dhome

Hemant Dhome : राज्यातील शाळांमध्ये पहिल्या वर्गापासून हिंदी (Hindi) भाषा शिकवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयाला तीव्र विरोध झाल्याने काल मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) यांनी हा निर्णय रद्द केला. तसेच नरेद्र जाधव (Narendra Jadhav) यांच्या अध्यक्षेखाली एक समिती स्थापन करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. यानंतर मराठी अभिनेते हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी एक्सवर एक पोस्ट केली.

नारायण राणेंची खासदारकी रद्द करा, मुलाला मंत्रिमंडळातून हाकला; हर्षवर्धन सपकाळांनी गोगावलेंचा मुद्दा उचलला 

शासनाने तुर्तास जीआर रद्द करण्याची घोषणा केलीय. पण ही लढाई संपलेली नाही. मराठी भाषेवर आलेल्या या संकटाशी आता दोन हात करण्याची वेळ आली आहे, असं ढोमे म्हणाले.

हेमंत ढोमे यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं की, मराठी शाळेतल्या तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात आणि मुळात मराठी भाषेच्या वाढीसाठी, गोडीसाठी डॅा. दीपक पवार यांनी आजच्या कार्यक्रमात अत्यंत मुद्देसूद आणि कठोर शब्दांत आपल्या मागण्या ठेवल्या आहेत! मराठी भाषा केंद्र आणि सर्व समविचारी संस्थाच्या या मागण्या महाराष्ट्राच्या ‘मराठी’ सरकार ला मान्य कराव्याच लागतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहून पाठिंबा तर दिलाच पण या लढ्यात या सर्वांसोबत शेवटपर्यंत सोबत राहून मला शक्य आहे ते योगदान देत राहीन हा निश्चय देखील केलाय

तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, 8 जणांचा होरपळून मृत्यू, 26 जण गंभीर जखमी 

आता दोन हात करण्याची वेळ
ढोमे यांनी पुढं लिहिलं की, मराठी भाषेवर आलेल्या या संकटाशी आता दोन हात करण्याची वेळ आली आहे. दुरदृष्टी असणाऱ्या सर्व मराठी प्रेमींना याची पुर्ण कल्पना आहे. स्थलांतरित लोकांची भाषा महाराष्ट्राने नव्हे तर इथे येणाऱ्या सर्वांनी महाराष्ट्राची ‘मराठी’ शिकण्याची गरज आहे, मराठी भाषेसोबत आता मराठी शाळा अभिजात करणं ही काळाची गरज आहे, असंची ढोमे म्हणाले.

ही लढाई संपलेली नाही
नुकताच शासनाने तुर्तास जीआर रद्द करण्याची घोषणा केलीय आणि समिती स्थापन करून मग त्यांच्या अहवालावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे असं आश्वासन दिलंय.
ही लढाई संपलेली नाही… हा विजय नाही, या तहात हरायचं नाही हे मनाशी बांधून मराठीच्या वाढीसाठी काम केलंच पाहिजे. आपल्या सर्व मागण्या पुर्ण होतील यासाठी ही चळवळ चालूच ठेवली पाहिजे, असं ढोमे म्हणाले.

 

Exit mobile version