तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, 8 जणांचा होरपळून मृत्यू, 26 जण गंभीर जखमी

तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, 8 जणांचा होरपळून मृत्यू, 26 जण गंभीर जखमी

Telangana Blast: तेलंगणाच्या (Telangana) संगारेड्डी जिल्ह्यात एका औषध उत्पादन कंपनीत झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला. तर 26 जण जखमी झाले. सोमवारी (३० जून) सकाळी ही घटना घडली आहे. दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे आणि तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पाशमायलाराम येथील सिगाची फार्मा कंपनीच्या प्लांटमध्ये हा अपघात झाला. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा कारखान्यात 100 हून अधिक कामगार काम करत होते. त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. जखमींना तात्काळ उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ज्यांना भारतीय सैन्य सलामी देत त्यांची शौर्यगाथा उलगडणार ‘120 बहादूर’ मधून 

या अपघातानंतर सर्वत्र गोंधळ उडाला होता. घटनास्थळी भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले असून सध्या युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आणि त्यांना आधुनिक उपचार देण्यासाठी सर्व शक्य पावले उचलण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ज्यांना भारतीय सैन्य सलामी देत त्यांची शौर्यगाथा उलगडणार ‘120 बहादूर’ मधून 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात झालेली दुर्घटना दुःखद आहे. जवळचा व्यक्ती गमावलेल्या कुटुंबियांप्रती संवेदना आणि जमखी बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो. तसेच पीएम फंडातून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात येत आहे, असं ट्वीट मोदींनी केलं.

दरम्यान, या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube