Maidaan Films Final Trailer out : अजय देवगण ( Ajay Devgan ) सध्या त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आला आहे. ‘मैदान’ ( Maidaan ) हा चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यात आता या चित्रपटाचा शेवटचा ट्रेलर रिलीज ( Final Trailer out ) करण्यात आला आहे. अजय देवगणच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी हा ट्रेलर रिलीज केला आहे. यामध्ये चाहत्यांना सय्यद अब्दुल रहीम कोण आहेत? यबद्दल कल्पना येत आहे.
CM शिंदेना ठाण्यातच सापडेना उमेदवार… भाजपच्या गणेश नाईकांच्या हाती ‘धनुष्य-बाण’ देणार?
गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘मैदान’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. याआधी त्याचा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. यानंतर चाहते खूप उत्साहित झाले. पण आता ती प्रतीक्षा संपली आहे.‘मैदान’ या चित्रपटात अजय देवगणची दमदार स्टाईल पाहायला मिळणार आहे. त्याचा हा लूक आत्तापर्यंतच्या पात्रांपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे.
या ट्रेलरमध्ये भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांनी भारतीय फुटबॉलसाठी कसा संघर्ष केला? त्यांच्या या प्रवासाची छोटी झलक प्रेक्षकांना या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. तर या अगोदरच्या ट्रेलरमध्ये भारताची आपल्या अस्मितेची लढाई दाखवण्यात आली आहे, जी फुटबॉल खेळाडू ‘मैदानावर’ लढतात.
लवकरच पिक्चर क्लिअर होणार; भाजप नेत्यानं राऊतांना सांगितली ‘मन की बात’
यामध्ये अजयने भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री प्रियामणी आणि गजराज राव हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात फुटबॉलचा सुवर्णकाळ दाखवला : सिनेमाच्या कथेबद्दल बोललो तर ते फुटबॉलचा सुवर्ण काळ दाखवले आहे, यममध्ये भारताकडे सर्व ट्रॉफी होत्या. 1952 ते 1962 हा फुटबॉलचा सुवर्णकाळ यात दाखवण्यात आला आहे. फुटबॉलच्या इतिहासातील हा सुवर्णकाळ मानला जातो. हा एक चरित्रात्मक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले आहे.