Adipurush Final Trailer: आदिपुरुषचा दुसरा ट्रेलर रिलीज, सोशल मीडियावर ‘जय श्री राम’चा नारा

Adipurush Final Trailer: आदिपुरुषचा दुसरा ट्रेलर रिलीज, सोशल मीडियावर ‘जय श्री राम’चा नारा

Adipurush Final Trailer: रामायणावर आधारित आदिपुरुष (Adipurush) या आगामी सिनेमाची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत आहे. प्रभास, (Prabhas) सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) हे स्टार या सिनेमामध्ये अतिशय चांगल्या रीतीने आपली भूमिका साकारली आहे.  हा सिनेमा 2023 च्या बहुप्रतिक्षित सिनेमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. गेल्या वर्षी या सिनेमाचा टीझर समोर आला, तेव्हा हा सिनेमा चांगलाच वादाच्या भवऱ्यात सापडला होता.

मात्र 9 मे रोजी निर्मात्यांनी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला, जो लोकांना खूपच आवडला आहे. गेल्या महिन्यात ट्रेलर रिलीज केल्यानंतर एक महिन्यानंतर निर्मात्यांनी आता आणखी एक ट्रेलर रिलीज केला आहे. या ट्रेलरला फायनल ट्रेलर असे नाव (Adipurush Final Trailer) देण्यात आले आहे. त्याचवेळी हा ट्रेलर सिनेमाच्या रिलीजच्या 10 दिवस अगोदर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये प्रभास पुन्हा एकदा दमदार स्टाईलमध्ये दिसून आला आहे .

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)


बहुप्रतिक्षित आदिपुरुष सोबतच एक बिग बजेट सिनेमा देखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सिनेमा बनवण्यासाठी निर्मात्यांनी जवळपास 500 कोटी रुपये खर्च केले आहेत. सिनेमाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. हा सिनेमा 16 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. तसेच हैदराबादमध्ये ‘आदिपुरुष’ या सिनेमाच्या ट्रेलरचे खास स्क्रीनिंग करण्यात आले होते. त्यानंतर आता चाहत्यांसाठी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

या ट्रेलरच्या सुरुवातीला हनुमान हा गुहेत तपश्चर्या करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर मग श्रीराम, लक्ष्मण हे सीतेसह वनवासात जात असल्याचे देखील दिसून आले आहे. राम आणि लक्ष्मण शबरीने दिलेली उष्टी बोरे खाताना दिसत आहेत. तसेच लक्ष्मणाची प्रकृती ठीक व्हावी यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्यापासून ते राम-लक्ष्मण वानरसेनेसह रामसेतूवरून लंकेला जाताना सर्व गोष्टींची झलक यामध्ये दाखवण्यात आली आहे. या ट्रेलरचा सर्वात शेवटी रावणाची झलक दाखवण्यात आली आहे.

‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

या सिनेमावर झालेल्या टीकेनंतर या सिनेमाच्या व्हीएफएक्समध्ये बरेच मोठे बदल करण्यात आले आहेत. या सिनेमातील रावणाचा लुक बदलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या सिनेमात हनुमानाची भूमिका साकारणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube