Download App

…म्हणून मला अमृता सोबत एक डान्स कोलॅब करायचं; मराठी अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा

Shubhankar Tawde: शुभंकर तावडे हा उत्तम अभिनय करून स्वतःच्या डान्सिंग मुव्हने कायम प्रेक्षकांना आपलंसं करून जातो.

Shubhankar Tawde: सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. तसेच त्यांच्या अफेयर, लव्ह लाइफबद्दल जाणून घ्यायला देखील चाहत्यांना आवडतं. ते कुठे राहतात, त्यांना काय आवडतं त्यांच्या कुटुंबात कोणकोणत असते, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. मात्र आता अभिनेता शुभंकरने (Shubhankar) फॅशन आयकॉन आणि बेस्ट डान्सर अशी बहुआयामी ओळख निर्माण केली. अभिनयाच्या सोबतीने तो उत्तम डान्सर सुद्धा आहे हे सगळ्यांना माहीत आहे. त्याचा भन्नाट रील मधून तो कायम चर्चेत असतो आणि यंदाच्या डान्स दिनी शुभंकरने (Shubhankar Tawde) त्याची खास गोष्ट व्यक्त केली आहे.

शुभंकर स्वतःच्या चित्रपटात परफॉर्म तर करतोच पण अनेक बड्या पुरस्कार सोहळ्यात तो त्याचा डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय नृत्य दिनी शुभंकरनं सांगितलं आहे की, मी आजवर अनेक कलाकारांच्या सोबतीने परफॉर्म केलं आहे मग ते विविध इव्हेंट असो किंवा पुरस्कार सोहळे मी अनेकांच्या सोबतीने डान्स केला आहे. डान्स हा माझा एक छंद आहे आणि तो मी कायम जोपासत असतो तर मला आजच्या दिवशी एक गोष्ट सांगावीशी वाटतेय भविष्यात मला एका व्यक्ती सोबत डान्स कोलॅब करायला आवडेल आणि ती म्हणजे माझी जवळची मैत्रिणी अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar) मला एक डान्स व्हिडिओ अमृता सोबत करायला आवडणार आहे.

Imran Khan: इम्रान खान 9 वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक; गोव्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

सर्वांना माहीत आहे, ती अफलातून डान्स करते तिच्या अदा या सगळ्यांना मोहित करून नेहमी जातात. बेस्ट अभिनेत्री तर आहे पण याहून सुंदर ती एक कमालीची नृत्यांगना आहे. जेव्हा ती डान्स करते तेव्हा नजर हलत नाही आणि ती एवढ्या ग्रेसफुल्ल पद्धतीने परफॉर्मन्स करते म्हणून मला माझ्या या अगदीच जळवच्या मैत्रिणी सोबत एखादा डान्स कोलॅब करायचा आहे, असं अभिनेत्याने यावेळी सांगितलं आहे.

शुभंकर तावडे हा उत्तम अभिनय करून स्वतःच्या डान्सिंग मुव्हने कायम प्रेक्षकांना आपलंसं करून जातो. सध्या तो अनेक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि लवकरच तो या प्रोजेक्ट्सबद्दल प्रेक्षकांना सांगणार असल्याचं कळतंय. शुभंकर सुद्धा आगामी चित्रपटात अभिनयाच्या सोबतीने त्याचा डान्सिंग ची झलक दाखवणार का ? हे बघण उत्सुकतेच असणार आहे.

follow us

वेब स्टोरीज