Imran Khan: इम्रान खान 9 वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक; गोव्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

Imran Khan: इम्रान खान 9 वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक; गोव्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

Imran Khan Comeback: आमिर खानचा (Aamir Khan) पुतण्या इम्रान खानने (Imran Khan ) त्याच्या पहिल्या ‘जाने तू या जाने’ (Jaane Tu Ya Jaane) या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. इम्रानने त्याच्या पहिल्या चित्रपटापासूनच इंडस्ट्रीवर दबदबा निर्माण केला होता. त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. पण त्यानंतर इम्रान खानची जादू लोकांवर चालली नाही आणि त्याने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. आता 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा इम्रान खान अभिनयाच्या दुनियेत परतणार आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे याचे दिग्दर्शन वीर दास करत आहेत. ‘हॅप्पी पटेल’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाद्वारे वीर दिग्दर्शनात पाऊल टाकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Film Companion (@filmcompanion)


इम्रान खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आता इम्रानच्या पुनरागमनाची माहिती मिळताच चाहत्यांना आनंदाला गगनात मावेनासा झाला आहे. या चित्रपटाची प्रत्येकजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे.

शूटिंग सुरु

पीपिंग मूनच्या वृत्तानुसार, इम्रान खाननेही चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. त्याने गोव्यात चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. इम्रानसोबत या चित्रपटात मुख्य अभिनेत्री कोण असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. मोना सिंग या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मोनाने यापूर्वीही आमिर खानच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने लाल सिंग चड्ढा, 3 इडियट्समध्ये काम केले आहे.

लहानपणीच एक स्वप्न पूर्ण होतंय …!, असं का म्हणतेय अमृता खानविलकर?, जाणून घ्या याबद्दल

आगामी चित्रपटाचे नाव काय?

इम्रान खानच्या कमबॅक चित्रपटाचे नाव आहे हॅप्पी पटेल. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे आमिर खानही यात एक कॅमिओ झळकणार आहे. हॅप्पी पटेलबद्दल सांगायचे तर हा एक विनोदी चित्रपट असणार आहे. हा चित्रपट आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनवला जात आहे.

हॅप्पी पटेलनंतर इम्रान खान लवकरच वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. इम्रानने पुनरागमन करण्याचा निर्णय घेतल्यापासून त्याच्याकडे कामाला सुरुवात झाली आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर इम्रान खान लेखा वॉशिंग्टनला डेट करत आहे. इम्रान आता लेखासोबत राहू लागला आहे. दोघेही करण जोहरच्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube