लहानपणीच एक स्वप्न पूर्ण होतंय …!, असं का म्हणतेय अमृता खानविलकर?, जाणून घ्या याबद्दल

लहानपणीच एक स्वप्न पूर्ण होतंय …!, असं का म्हणतेय अमृता खानविलकर?, जाणून घ्या याबद्दल

Amruta Khanvilkar: ‘लुटेरे’ वेबसीरिजमधून 2024 वर्षांची सुरूवात करणारी अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आता आणखी एका हिंदी वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ती अॅमेझॉन मिनी टीव्हीवरील चाचा विधायक है हमारे 3 मध्ये (social media) झळकणार आहे. (Lootere web series) लुटेरेमधली अविका ते आता लयकारी अदा, नजर खिळवून ठेवणाऱ्या अमृता ‘कथ्थक’ देखील शिकत आहे. असा अमृताचा अनोखा प्रवास अखंड सुरूच आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)


अभिनेत्री, नृत्यांगना अमृता खानविलकर ही कायम तिच्या अदाकारी मधून प्रेक्षकांना मोहित करते. तिने आजवर अनेक अफलातून भूमिका साकारून त्या अजरामर केल्या. अमृता अभिनयाच्या सोबतीने उत्तम डान्सर देखील आहे हे तिच्या सोशल मीडियावरून आणि तिच्या आयकॉनिक डान्स परॉर्मन्समधून नेहमीच दिसत. नटरंग मधील “वाजले की बारा” असू दे किंवा चंद्रमुखी मधील “चंद्रा” अमृताने कायम तिच्या अनोख्या नृत्याने सगळ्यांना मोहित केलं. तिचं नृत्यावर असलेलं प्रेम आजही ती अनेक मुलाखती मधून व्यक्त करताना दिसते.

सध्या अमृता तिच्या बॉलिवुड प्रोजेक्ट्स मधून चर्चेत आहे, पण तुम्हाला माहिती आहे का? अमृता अभिनयाच्या सोबतीने तिचं क्लासिकल नृत्याच शिक्षण सुद्धा घेते आहे. तिच्या लयकारी अदा, नजर खिळवून ठेवणाऱ्या हूक स्टेप्स प्रेक्षकांना कायम मोहित करतात आणि अश्यातच अमृता “कथ्थक” देखील शिकत आहे. अभिनयाच्या सोबतीने स्वतःचे छंद जोपासून त्या साठी कष्ट घेणारी अमृता आता हा डान्स फॉर्म सुद्धा शिकतेय. एवढंच नाही तर ती त्या साठी शास्त्रीयपूर्ण शिक्षण घेताना दिसतेय. अमृताच डान्स बद्दलच प्रेम हा तिच्या जिव्हाळ्याच्या विषय आहे आणि म्हणून तिने कथ्थक शिकण्याचा निर्णय घेतला आहे. अमृता नुकतीच ” हिरामंडी ” साठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सोबत दिसली होती आता हे दोघं भविष्यात सोबत काम करणार का ? हा प्रश्न देखील तिच्या चाहत्यांना पडला आहे.

Aamir Khan: आमिरला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग कोणी दिला? अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा!

याबद्दल बोलताना अमृता म्हणाली की, लहानपणी सगळ्यांची स्वप्न असतात आपण मोठं होऊन हे करावं ही आवड जोपासावी तसचं माझं एक लहानपणीच स्वप्न होत आपण कथ्थक शिकावं. नृत्य म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण असा विषय होता पण लहानपणी तेवढी परिस्तिथी नसल्यामुळे मला कथ्थकच प्रशिक्षण घेता आल नाही म्हणून ही इच्छा मी आता पूर्ण करतेय आणि त्याचा खूप जास्त आनंद आहे. मंजिरी देव यांची नातसून प्रिया यांच्या कडून मी कथ्थकच प्रशिक्षण घेत आहे” आगामी काळात अमृता बॉलिवुड सोबत अनेक मराठी प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे. “कलावती” , “ललिता बाबर” , “पठ्ठे बापूराव” असे अनेक प्रोजेक्ट्स तिच्या लाईनअपमध्ये आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube