Amruta Khanvilkar अन् झाकीर खान नव्या शोसाठी सज्ज; पाहा फोटो

लुटेरेमधून 2024 ची बॉलिवुडमय सुरुवात करून अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये झळकणार आहे.

2024 मधला आमृताचा हा दुसरा बॉलिवुड प्रोजेक्ट असून ती आता अमेझॉन मिनी टीव्ही वरच्या 'चाचा विधायक है हमारे 3' मध्ये झळकणार आहे.

लुटेरेमधली अविका ते आता चाचा विधायक है हमारे 3 मधली सुरेखा जी हा अमृताचा बॉलिवुड प्रवास अखंड सुरूच आहे.

अमृताने सोशल मीडियावरून ही खास बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे.

हा शो लवकरच सगळ्यांचा भेटीला येतोय म्हणून मी खूप उत्सुक आहे.

चाचा विधायक है हमारे सीजन 3 मध्ये झाकीर खान सारखा दर्जेदार कॉमेडियन सोबत काम करण्याचा योगायोग या निमित्ताने जुळून आला आहे.
