Animal Day 3: ‘अ‍ॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रविवारी प्रेक्षकांची तिकीटबारीवर गर्दी

Animal Box Collection Day 3: दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा ‘अॅनिमल’ (Animal Movie) सिनेमाचा सर्वत्र जोरदार बोलबाला बघायला मिळत आहे. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. (Box Collection ) त्यानंतर आता रविवारी सिनेमाने किती गल्ला […]

Animal Day 3: ‘अ‍ॅनिमल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रविवारी प्रेक्षकांची तिकीटबारीवर गर्दी

Animal Day 3: ‘अ‍ॅनिमल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; रविवारी प्रेक्षकांची तिकीटबारीवर गर्दी

Animal Box Collection Day 3: दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा ‘अॅनिमल’ (Animal Movie) सिनेमाचा सर्वत्र जोरदार बोलबाला बघायला मिळत आहे. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. (Box Collection ) त्यानंतर आता रविवारी सिनेमाने किती गल्ला कमावला आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया…


1 डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ या सिनेमाचे प्रेक्षकांकडून आणि चाहत्यांकडून सकारात्मक रिव्ह्यू आले आहेत. तीन दिवसात सिनेमाने 200 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. रविवारी सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. ‘अॅनिमल’ या सिनेमातील रणबीर कपूरचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमाला ए रेटिंग देण्यात आले आहे.

‘अॅनिमल’ या सिनेमाने ओपनिंग डेच्या दिवशी 63.8 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. तर जगभरात सिनेमाने 116 कोटी रुपये कमावले आहेत. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 66.27 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. यामध्ये हिंदी भाषेतील सिनेमाने 58.37 कोटी रुपये कमावल्याची माहिती समोर आली आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सिनेमाने सर्वाधिक कमाई केली आहे. सिनेमाने 72.50 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. आतापर्यंत सिनेमाने एकूण 202.57 कोटी रुपये कमावले आहेत. जवान सिनेमानंतर दुसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘अॅनिमल’ हा सिनेमा ठरला आहे.

Pillu Bachelor: कलेक्टर पिल्लूचा शोध; सायली संजीव, पाठकबाई अन् पार्थच्या “पिल्लू बॅचलर”चा ट्रेलर रिलीज

‘अॅनिमल’ हा सिनेमा 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाची चाहत्यांमध्ये सुरुवातीपासूनच मोठी उत्सुकता लागली होती. आता सिनेमा येत्या काही दिवसांमध्ये किती कमाई करतो हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Exit mobile version