Niharika Konidela Divorce : बॉलिवूड असो की, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असो आजकाल घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. दरोदर एखाद्या तरी अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या घटस्फोटाची बातमी आल्याशिवाय राहत नाही. त्यातच आता दाक्षिणात्य अभिनेता रामचरणची चुलत बहिण आणि निर्माती व अभिनेत्री असलेली निहारिका कोनीडेलाचा देखील घटस्फोट झाला आहे. ( South Actress Ramcharans sister Niharika Konidela take divorce form Chaitanya Jonnalagadda )
अमेरिकेत गोळीबार; एका भारतीयाचा मृत्यू, दोन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात
निहारिकाने स्वतः याबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली. निहारिका कोनीडेला आणि तिचा पती चैतन्य जोनलगड्डा हे दोघे लग्नानंतर 3 वर्षांनी विभक्त झाले आहेत. निहारिका ही सुपरस्टार चिरंजीवी यांची पुतणी आहे. तिच्या या घटस्फोटाच्या या बातमीने चाहते आश्चर्य चकीत झाले आहेत. तिने हैद्राबाद न्यायालायात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता दोघे विभक्त झाले आहेत.
व्यवसायावरुन टीका म्हणजे हीन दर्जाचं राजकारण, राऊतांच्या टीकेवर उदय सामंताचं प्रत्युत्तर…
काय म्हणाली निहारिका?
निहारिकाने स्वतः घटस्फोटाबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली. निहारिकाने लिहिले की, मी आणि चैतन्याने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या या निर्णयानंतर आम्हाला आमच्या आयुष्यात पुढे जातना सहानुभुती दाखवली जावी. हा निर्णय घेताना पाठिंबा देणाऱ्या मित्र आणि कुटुंबांचे आभार. तसेच आम्हाला या निर्णयानंतर नव्या स्वतंत्र आयुष्यात रूळेपर्यंत प्रायव्हसी दिली जावी. समजून घेतल्याबद्द धन्यवाद! असं म्हणत यावेळी निहारिकाने आपल्या या पोस्टचा कमेंट बॉक्स बंद करून ठेवला आहे. जेणे करून लोकांनी यावर कमेंट करू नये.
कोण आहे निहारिकाचा पती चैतन्य?
निर्माती व अभिनेत्री असलेली निहारिका कोनीडेलाचा चैतन्य जोनलगड्डा हा पोलीस महानिरीक्षकांचा मुलगा आहे. त्यांनी डिसेंबर 2020 शाही पद्धतीने विवाह केला होता. मात्र त्यानंतर काही काळातच त्यांच्याच वाद निर्माण होऊ लागले होते. त्यांचा घटस्फोट होणार अशा चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. एप्रिलमध्येच तिने चैतन्यसोबतच्या पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केल्या होत्या. तर अभिनेता वरूण तेजच्या साखरपुड्यातही ती एकटीच दिसली होती. त्यानंतर आता तिने पोस्ट करत घटस्फोटाची माहिती दिली होती.