व्यवसायावरुन टीका म्हणजे हीन दर्जाचं राजकारण, राऊतांच्या टीकेवर उदय सामंताचं प्रत्युत्तर…
व्यवसायावरुन टीका करणं म्हणजे हीन दर्जाचं राजकारण, या शब्दांत उद्योगममंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे आधी रिक्षा चालवायचे आता टेम्पो चालवत असल्याचं विनायक राऊत म्हणाले होते. त्यावरुन आता उदय सामंतांनी राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
शिंदेंचे किती आमदार परतणार? राऊतांनी थेट आकडाच सांगितला
उदय सामंत म्हणाले, एखाद्याच्या व्यवसायावरुन टीका करणं म्हणजे राजकारण किती हीन दर्जाचं झालंय हे समजत आहे. एक सर्वसामान्य माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे हे ते कबूल करतात, त्यांच कौतूक, आणि अभिनंदनच करावं लागेल, असंही ते म्हणाले आहेत.
शेतकरी सुखावला! राज्याच्या काही भागांत पावसाची जोरदार बॅटिंग, तर कोकणात रेड अलर्ट
एकीकडे शिवसेनेच्या बंडानंतर आमच्या टीका केली जात आहे. पण एकनाथ शिंदे हे संवेदनशील, संयमी आहेत. ज्या सहकाऱ्यांसोबत काम केलं, त्यांच्या टीकेकडे ते लक्ष देत नसून काम करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आधी गद्दार, खोके अशा घोषणा देत होते आता का देत नाहीत? तेही जाहीर करा ना, असं खुलं चलेंजच सामंतांनी दिलं आहे. दरम्यान, आम्ही बोलत नाही संयम ठेवतो, म्हणून काही लोकांचं साध्य होतंय, असंही ते म्हणाले आहेत.
‘चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही’; शरद पवारांनी सांगितला हा प्लॅन
शरद पवारांचं कौतूकच :
आम्ही शिवसेनेत असताना जो बंड केला तसाच बंड आज राष्ट्रवादीत अजितदादांनी केला आहे. त्यावरुन माध्यमांनी जेव्हा शरद पवारांना विचारलं की तुम्ही त्यांना गद्दार, खोके, असं म्हणणार का? त्यावर हा माझा स्वभाव नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पवारसाहेबांचं कौतूकचं केलं पाहिजेत, त्यांच्याकडून वान नाहीतर गुण तरी घ्यावा, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला आहे.
दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली वर्षा निवासस्थानावर बैठक पार पडली. या बैठकीत दोन आमदारांमध्ये जुंपल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावरही उदय सामंतांनी सडेतोड भाष्य केलं आहे. ते म्हणाले, कालच्या बैठकीत सर्वच आमदारांची हजेरी होती. बैठकीमध्ये आगामी विधानसभा आणइ लोकसभेच्या अधिवेशनात कसं कामकाज करावं, संघटनात्मक पक्षबांधणीचे निर्देश देण्यात आले आहेत. जे घडलंच नाही त्याची माहिती पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करुन पोळी भाजण्याचा प्रकार राजकारणी करीत असल्याचा आरोप सामंतांनी केला आहे. मात्र, जे कोणी संभ्रम पसरवत आहेत त्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नसल्याचंही सामंतांनी ठामपणे सांगितलंय.