‘चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही’; शरद पवारांनी सांगितला हा प्लॅन

‘चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही’; शरद पवारांनी सांगितला हा प्लॅन

Sharad Pawar On Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले पुतणे अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह यावर दावा कायम ठेवला आहे. चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. तसेच  माझा फोटो त्यांनी वापरला. कारण त्यांना माहिती आहे आपलं नाणं चालणार नाही, असे म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

अजित पवार व शरद पवार या दोघांनी आज आपापल्या समर्थकांची बैठक बोलावली होती. अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. त्यांच्या निवृत्तीविषयी भाष्य केले. यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणामध्ये पक्ष व चिन्ह हे आपल्याचकडे राहणार असून त्यावर आपला दावा कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.

पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांनी पाठवले, फडणवीसांसोबत बैठका झाल्या; अजित पवारांचा गौप्यस्फोट

ज्यांनी आम्हाला सत्तेत आणले ती जनता आणि कार्यकर्ते आमच्यासोबत  असल्याचाही पवारांनी उल्लेख केला. ज्या आमदारांनी विभाजनाचा निर्णय घेतला, त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. अजित पवार गटाने कोणतीही प्रक्रिया पाळली नसल्याचेही यावेळी पवारांनी सांगितले.

तसेच आमचे चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. तसेच आम्ही घड्याळ, हात, चरख्यावर लढलो, अशी आठवण पवारांनी सांगितली.  माझा फोटो त्यांनी वापरला. कारण त्यांना माहिती आहे आपलं नाणं चालणार नाही, असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

वय झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

मला पांडूरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं सांगायचं असा कार्यक्रम काहींनी सुरू केल्याचं म्हणत पवारांनी भुजबळांना प्रत्युत्तर दिले आहे. या अगोदर भुजबळांनी पवार साहेब आमचे विठ्ठल असून त्यांच्याभोवती बडवे जमा झाल्याचे भुजबळ म्हणाले होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, पक्षाच्या स्थापनेला 24 वर्षे झाली असली तरी ही बैठक ऐतिहासिक आहे. आज देश आपल्याकडे पाहत आहे, कार्यकर्त्यांमुळेच आपण इथपर्यंत पोहोचू शकलो, असे शरद पवार म्हणाले. आम्ही सत्तेचे भुकेले नाही, आम्ही सेवेच्या भावनेने पुढे जात आहोत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube