शेतकरी सुखावला! राज्याच्या काही भागांत पावसाची जोरदार बॅटिंग, तर कोकणात रेड अलर्ट

शेतकरी सुखावला! राज्याच्या काही भागांत पावसाची जोरदार बॅटिंग, तर कोकणात रेड अलर्ट

Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामध्ये विशेषत: कोकण, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. पुढील तीन ते चार दिवस रत्नागिरीसह रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आमदारांची पळवापळवी वाढली, उज्वल निकम म्हणाले, पक्षांतरबंदी कायदा कडक करा

राज्यातील काही भागांत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावल्याचं दिसून येत आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने बॅटिंग केलीय. पावसासाठी शेतकऱ्यांची कामे रखडली होती, अखेर जोरदार पावसाने आता शेतीची कामे वेग धरणार आहेत.

राष्ट्रवादी 90 तर भाजप 150 जागा लढविणार, अजितदादा मुख्यमंत्रीपदी; शिंदेंच्या वाट्याला काय?

या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलायं. तर नाशिक, धुळे, पुणे, कोल्हापुरसर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलायं.

‘चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही’; शरद पवारांनी सांगितला हा प्लॅन

दरम्यान, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. पावसाच्या आगमनामुळे रखडलेली शेतीची कामे वेग धरणार आहेत.

राज्यातील धुळे, परभणी, अकोला, मुंबई, ठाणे, अहमदनगरमध्ये काल मुसळधार पाऊस बरसला आहे. तर कोकण भागातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसत आहे. विशेषत: घाटमाथ्यावरील गावांत पाऊस पडत असल्याचं दिसून येत आहे. कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग होत असल्याने नद्यांसह धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube