Stolen Film Trailet released on Prime Video Abhishek Banerjee : पुरस्कारप्राप्त आणि समीक्षकांकडून गौरवलेला ‘Stolen’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला (Bollywood News) आहे. प्रेक्षकांना एका रोमांचकारी आणि भावनांनी भरलेल्या प्रवासाची झलक मिळाली आहे. या ट्रेलरमध्ये न्याय आणि सूड यांची सीमा कशी धुसर होते, हे प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. आता या चित्रपटातील (Entertainment News) सर्वात शक्तिशाली आणि भावनिकदृष्ट्या तीव्र सीनपैकी एकाचा व्हिडिओ निर्मात्यांनी शेअर केला आहे.
या गडद आणि हादरवून टाकणाऱ्या क्षणाचा उल्लेख करताना अभिनेता अभिषेक बनर्जी यांनी तो ‘भावनिकदृष्ट्या सर्वात वेदनादायक सीन’ असल्याचे सांगितले. या सीनमुळे चित्रपटातील खोल वास्तवाचे दर्शन घडते. त्यामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेत अधिकच (Stolen Film Trailer released on Prime Video) वाढ झाली आहे. आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेला ‘Stolen’ आता प्रेक्षकांच्या अत्यंत प्रतीक्षेत आहे.
महायुती सरकार येवून पाच महिने झाले….पण, राज्यमंत्र्यांना अधिकारच नाही, थेट CM फडणवीसांना पत्र
ट्रेलरची सुरुवात एक काळजाला भिडणारा प्रसंग दाखवत करते. झुंपा (मिया मेलझर) झोपलेली असताना तिच्या हातून तिचं लहान बाळ पळवून नेलं जातं, एका ओस पडलेल्या रेल्वे स्थानकावर. त्यानंतर झुंपाच्या मदतीला धावून येतात (Stolen Film) भाऊ रमन आणि गौतम – शुबम वर्धन आणि अभिषेक बनर्जी यांनी साकारलेले. तिघंही मिळून त्या अपहृत मुलीच्या शोधात निघतात, जिथे त्यांना भारताच्या दुर्गम भागांतून जीवघेणा प्रवास करावा लागतो, स्थानिकांच्या शत्रुत्वाचा सामना करावा लागतो. या शोधमोहीमेत त्यांचा प्रवास एका अस्तित्वासाठीच्या संघर्षात रूपांतरित होतो.
धनंजय मुंडे प्रकरण, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनियांची चौकशी होणार; कारण काय?
‘Stolen’ हा जंगल बुक स्टुडिओचा चित्रपट असून, याचे दिग्दर्शन करण तेजपाल यांनी केले आहे. त्यांनी गौरव ढिंग्रासह आणि स्वप्नील सालकर (अगडबम) यांच्यासोबत पटकथा लिहिली आहे. चित्रपटात अभिषेक बनर्जी, हरीश खन्ना, मिया मेलझर, सहिदुर रहमान आणि शुबम वर्धन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कार्यकारी निर्माते म्हणून अनुराग कश्यप, किरण राव, निखिल अडवाणी आणि विक्रमादित्य मोटवणे यांची साथ लाभलेला ‘Stolen’ 4 जून रोजी Prime Video वर भारतात आणि 240 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.