Tamil Actor Delhi Ganesh Passed Away : तमिळ चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी (Actor Death) समोर आली आहे. प्रसिद्ध तमिळ चित्रपट अभिनेते दिल्ली गणेश यांचं निधन झालंय. अनेक दिवसांपासून वाढत्या वयामुळे ते अनेक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते, असं सांगण्यात येत आहे. मात्र काल रात्री त्यांनी (Entertainment News) वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काल 09 नोव्हेंबर रोजी चेन्नईमध्ये गणेशन यांचा मृत्यू झालाय. त्यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला (Delhi Ganesh Passed Away) आहे. त्यांचे सर्व चाहते देखील त्यांच्या आवडत्या अभिनेत्याच्या निधनाने दु:खी आहेत.
दिल्ली गणेश यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1944 रोजी झाला होता. ते 80 वर्षांचे होते. 1976 मध्ये त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या पट्टिना प्रवेशम या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. आपल्या चित्रपट प्रवासात त्यांनी 400 हून अधिक तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले. नायकन (1987) आणि मायकल मधना कामराजन (1990) यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ते ओळखले जात होते. चेन्नई एक्सप्रेस आणि अजब प्रेम की गजब कहानी यांसारख्या बॉलीवूडच्या दोन प्रोजेक्ट्सचे देखील ते भाग होते.
वकीलांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध ; कराडमध्ये डॉ. अतुल भोसलेंनी दिला शब्द
दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली होती. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी टीव्ही मालिका आणि लघुपटांमध्येही काम केलं होतं. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी लोकांच्या हृदयावर खोलवर छाप सोडली. त्यांच्या या प्रवासात त्यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलंय. अभिनेत्याचे खरे नाव गणेशन होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. परंतु, व्यावसायिकदृष्ट्या ते दिल्ली गणेश म्हणून ओळखले जात होते. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ते दिल्लीतील थिएटर ग्रुप दक्षिण भारत नाटक सभेचे सदस्य होते. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी गणेशने 1964 ते 1974 या काळात भारतीय हवाई दलातही काम केले होते.