Zakir Hussain Hospitalised: मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे अमेरिकन शहरातील सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
झाकीर हुसेन यांचे मित्र आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत राहणारे 73 वर्षीय तबलावादक झाकीर हुसेन रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त होते.
Ustad Zakir Hussain, Tabla player, percussionist, composer, former actor and the son of legendary Tabla player, Ustad Allah Rakha is not well. He’s being treated for serious ailments in a San Francisco hospital, USA, informed his brother in law, Ayub Aulia in a phone call with… pic.twitter.com/6YPGj9bjSp
— Pervaiz Alam (@pervaizalam) December 15, 2024
झाकीर हुसैन यांना हृदयविकाराच्या समस्येमुळे गेल्या आठवड्यात सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हुसेनची तब्येत बिघडली असून सध्या ते आयसीयूमध्ये दाखल आहेत. अशी माहिती चौरसिया यांनी दिली.
झाकीर हुसैन यांनी तीन वर्षांचे असताना पहिल्यांदा तबला वाजवला होता त्यानंतर हळूहळू त्यांनी सराव सुरू केला आणि वयाच्या सातव्या वर्षी तबला वादनात पारंगत झाले . वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी आपले कौशल्य लोकांसमोर दाखवायला सुरुवात केली आणि आजपर्यंत आपल्या कलेने लोकांना मंत्रमुग्ध करत आहे.
Maharashtra Cabinet Expansion : मोठी बातमी! ‘या’ दिवशी होणार महायुती सरकारचं खातेवाटप