Download App

झेलेन्स्कीचा कॅमेऱ्यासमोर ट्रम्पशी वाद, अमेरिकेचा मोठा निर्णय, युक्रेनची आर्थिक मदत थांबणार?

Donald Trump-Zelensky Clash : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की

  • Written By: Last Updated:

Donald Trump-Zelensky Clash : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्यात व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये कॅमेऱ्यासमोर वाद झाल्याने अमेरिका आता ॲक्शन मोड आला आहे. माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युक्रेनला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवण्याचा विचार करत आहे. तसेच आतापर्यंत देण्यात आलेल्या आर्थिक मदतीचा युक्रेनने कुठे- कुठे वापर केला आहे. याची देखील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, एलोन मस्क आणि त्यांचे सरकारी कार्यक्षमता विभाग युक्रेनला देण्यात येणाऱ्या मोठ्या आर्थिक आणि सुरक्षा मदतीतील आधीच चौकशी करत होते, परंतु आता चौकशी वेगाने होणार आहे. तसेच ट्रम्प युक्रेनला देण्यात येणारी सर्व लष्करी मदत थांबवण्याचा विचार करत असल्याची माहिती देखील या अधिकाऱ्याने दिली आहे.

एलोन मस्क यांची प्रतिक्रिया

या प्रकरणात एलोन मस्क यांनीही युक्रेनची चौकशी करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहे. युक्रेनला पाठवलेल्या शेकडो अब्ज डॉलर्सचे खरोखर काय झाले हे शोधण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे.

प्रकरण काय?

28 फेब्रुवारी 2025 रोजी व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची एक बैठक पार पडली. मात्र या बैठकीत रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याच्या मार्गांवर ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात मतभेद निर्माण झाले, ज्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला.

अफगाणिस्तानला धक्का, ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये धडक

या बैठकीत ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला, तर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिलेल्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या वादानंतर ट्रम्प यांनी बैठक संपवली आणि झेलेन्स्कीला व्हाईट हाऊस सोडण्यास सांगण्यात आले.

follow us