स्वप्न भंग, अफगाणिस्तानला धक्का, ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये धडक

Afghanistan Vs Australia : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची देखील एंट्री झाली आहे. इंडिया, न्यूझीलंडनंतर सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा ऑस्ट्रेलिया तिसरा संघ ठरला आहे. आज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दहावा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवण्यात आला मात्र पावसामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Australia etch their name in the semi-finals of another ICC event 👊 #ChampionsTrophy pic.twitter.com/q5rrn6aX7P
— ICC (@ICC) February 28, 2025
या सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला धक्का बसला स्टार फलंदाज रहमानउल्लाह गुरबाज बाद झाला. तर अटलने 85 धावा केल्या आणि शाहिदीला 20 धावा करत्या आल्या. ओमरझाईनेही 54 चेंडूत शानदार अर्धशतक पूर्ण केले आणि या सामन्यात त्याने 63 चेंडूत 67 धावांची खेळी केली.
कांगारू संघाकडून बेन द्वारशुइसने तीन तर स्पेन्सर जॉन्सन आणि अॅडम झांपा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. अफगाणिस्तानने 50 षटकांत 273 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 12.5 षटकांत 109 धावा केल्या मात्र त्यानंतर पाऊसामुळे सामना होऊ शकला नाही. सामना रद्द झाल्यानंतर अफगाणिस्तानला एक गुण मिळाला. त्यामुळे त्यांचे या स्पर्धेत 3 गुण झाले आहे आणि त्यांचे सेमीफाइनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत आहे.