Pakistan News : वित्त मंत्रालय आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी एक (Pakistan News) मोठा खुलासा केला आहे. या खुलाशामुळे देशात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला (IMF) अब्जावधी डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम कर्जाच्या व्याजापोटी दिली आहे. बैठकीत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून लक्षात आले की कर्जाच्या व्याजापोटी देण्यात आलेली रक्कम एक हजार अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
पैसा नेहमी जपून खर्च केला पाहिजे असे नेहमीच म्हटले जाते. पण ही गोष्ट पाकिस्तानला लागू होत नाही. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेकडे (Pakisan Economy) पाहिल्यानंतर हे सहज लक्षात येईल. कोलमडत चाललेल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी पाकिस्तान सरकारने आयएमएफकडे तीन अब्ज डॉलर्स कर्जाची मागणी केली होती. यानंतर पहिल्या हप्त्यात एक अब्ज डॉलर पाकिस्तानला मिळाले होते. यानंतर मदतीच्या पॅकेजचा आकार वाढला. पण यासोबतच अनेक अटी लादण्यात आल्या. मात्र याआधी पाकिस्तानने कर्जाऊ घेतलेल्या रकमेवर भरमसाठ व्याज द्यावे लागले आहे.
Pakistan News : कंगाल पाकिस्तानला गुडन्यूज! ‘आयएमएफ’ने केली मोठ्ठी घोषणा
पाकिस्तानी संसदेत गुरुवारी ज्यावेळी याबाबत माहिती देण्यात आली त्यावेळी सगळ्यांनाच धक्का बसला. मागील चाळीस वर्षांच्या काळात सरकारने आयएमएफकडून मिळालेल्या कर्जापोटी साडेतीन अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त रक्कम व्याज म्हणून दिली आहे. गुरुवारी आर्थिक प्रकरणाशी संबंधित सिनेट स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत आयएमएफकडून घेतलेले कर्ज आणि कर्ज परतफेडीसाठी दिलेली रक्कम यांची माहिती देण्यात आली. यानंतर ही माहिती संसदेत सादर करण्यात आली.
द एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार अर्थ मंत्रालय आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत खुलासा केला की पाकिस्तानने आयएमएफला 3.6 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम कर्जाच्या व्याजपोटी दिली. ही रक्कम पाकिस्तानी चलनात 1 हजार अब्ज रूपयांपेक्षा जास्त आहे. इतकी मोठी रक्कम फक्त व्याज म्हणून दिल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
अहवालात असेही दिसून आले की मागील तीस वर्षात पाकिस्तानने आयएमएफकडून एकूण 29 अब्ज डॉलर्स उधार घेतले. याच काळात 21.72 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम परत केली. मागील चार वर्षांच्या काळातच पाकिस्तानने आयएमएफला 1.10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम व्याजपोटी दिली. पाकिस्तानने 2024 मध्ये आयएमएफकडून एसडीआरच्या रूपात 1.35 अब्ज डॉलर्स उधार घेतले आणि एसडीआरमध्ये 64.669 कोटी डॉलर दिले. एसडीआर व्यवस्था आयएमएफचाच एक हिस्सा आहे. प्रत्येक सदस्य देश यामध्ये योगदान देतो त्या बदल्यात सदस्य देशाला विड्रॉलचा अधिकार मिळतो. एसडीआरच्या माध्यमातून ज्या देशाला ज्या चलनात पैसे पाहिजे त्या चलनात पैसे देण्यासाठी मदत केली जाते.
पाकिस्तानात हिंसाचार! जमिनीच्या वादातून थेट गोळीबार, 30 जणांचा मृत्यू; दीडशे जखमी
पाकिस्तानने 1984 पासून आयएमएफकडून 19.55 अब्ज डॉलर्सचे एसडीआर उधार घेतले आणि 14.71 अब्ज डॉलर्स एसडीआर परत केले. ज्यामध्ये एसडीआरवरील 2.44 अब्ज डॉलर्स व्याजपोटी देण्यात आल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. यानंतर समितीने कठोर भूमिका घेत आयएमएफ बरोबर झालेल्या प्रत्येक घडामोडींची माहिती मागितली आहे. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे ज्यावेळी पाकिस्तानला आयएमएफकडून सात अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मिळणार आहे.