Download App

Carlos Alcaraz : परिस्थितीने वडिलांना टेनिस खेळू नाही दिलं, पण मुलाच्या खेळाची प्रेक्षकांना भूरळ…

Carlos Alcaraz : कार्लोस अल्कारेझ गारफिया… हे नाव टेनिसच्या जगात आहे. अल्कराज कोर्लोसने विंबलडन 2023 अंतिम फेरीत चॅम्पियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा पराभव केला. त्याने जोकोविचचा 5 सेटमध्ये 1-6, 7-6, 6-1, 3-6 आणि 6-4 असा पराभव केला. अल्काराजच्या खेळाचे अनेक चाहते आहेत. त्याचं वय आत्ता अवघं 20 आहे. एवढ्या कमी वयात अल्कराज अप्रतिम खेळ कसा करतो. त्याच्या यशामागे कोण आहे. याबद्दल जाणून घेऊयात…

Maharashtra Politics : राष्ट्रवादीत टाचणी पडताच चर्चेत येणार ‘यशंवतराव चव्हाण सेंटर’ काय आहे?

कार्लोस अल्कारेझ गोन्झालेझ असं अल्कारेझच्या वडिलांचं नाव. तेही टेनिसपटू होते. सध्या अल्कारेझचे वडील स्पेनमध्ये टेनिस अकॅडमी चालवत आहेत. त्यांची स्पेनच्या उत्कृष्ट खेळाडूंमध्ये गिनती होते. मात्र, खडतर परिस्थिती, उपयुक्त पैसे नसल्याने त्यांचे चॅम्पियनशिपचे स्वप्न भंग झालं. त्यानंतर गोन्झालेझने टेनिस प्रशिक्षक होण्याचा निर्णय घेत आपल्या गावात टेनिस अकॅडमी सुरू केली. अल्कारेझने वयाच्या चौथ्या वर्षी रॅकेट हाती घेतले. त्यानंतर अल्कारेझचा खेळ पाहुन प्रेक्षक भलतेच फॅन झाले.

Praveen Darekar यांचं मंत्रिपदासाठी वेटींग; पण विरोधकांचे ‘त्या’ जखमेवरच मीठ

आपल्या लहान वयापासूनच अल्कारेझ चांगलं टेनिस खेळत होते. त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेले टेनिसपटूंनाही ते पाणी पाजत असत. अल्कारेझचा खेळ गोन्झालेझने लवकरच ओळखला. आपला मुलगा जग जिंकू शकतो, हा विश्वास त्यांना आला. त्यासाठी त्यांनी एका प्रतिनिधीची नेमणूक केली. 15 व्या वर्षी अल्काराज माजी जागतिक क्रमवारीतील खेळाडू जुआन कार्लोस अल्कारेझ फेरेरोच्या अकॅडमीत पोहोचला, त्यानंतर तिथून त्याचा खेळच बदलला.

विश्वचषक आणि आयपीएल विजेतेपदांच्या तुलनेत ग्रँड स्लॅमची बक्षिसे रक्कम किती असते?

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी कार्लोस अल्कारेझने एटीपी टूरमध्ये पदार्पण केलं आणि एका वर्षानंतर त्याने संपूर्ण जगाला आपली प्रतिभा सिद्ध केली. वयाच्या 17 व्या वर्षी कार्लोस अल्कारेझने ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये त्याला दुसरी फेरी गाठता आली नाही पण स्पर्धेत पोहोचून त्याने पहिला सामना जिंकला.

Ahmednagar Politics : शिर्डीच्या खासदाराची चलबिचल, थेट भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांच्या भेटीला

2021 सालात अल्कारेझची जगभरात ओळख झाली. या खेळाडूने क्रोएशिया ओपन जिंकून खळबळ उडवून दिली. त्यावेळी कार्लोस अल्कारेझ हे अवघे 18 वर्षांचे होते. 2021 मध्येच या खेळाडूने यूएस ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मात्र, दुखापतीमुळे त्याला आणखी प्रगती करता आली नाही आणि तो यूएस ओपनची उपांत्यपूर्व फेरीही खेळू शकला नाही. 2022 मध्ये, या खेळाडूने ATP 500, ATP मास्टर्स 1000 स्पर्धा जिंकल्या. या विजयानंतर हा खेळाडू क्रमवारीत 11व्या क्रमांकावर पोहोचला.

पैशाअभावी वडील टेनिस खेळू शकले नाहीत. आज अल्कारेझने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या खेळाच्या जोरावर सुमारे 100 कोटींची कमाई केली आहे. जगातील आघाडीच्या कंपन्या या खेळाडूला स्पॉन्सर करीत आहेत. यामध्ये रॉलेक्स, केल्विन क्लेन, बीएमडबल्यू कंपन्यांचा समावेश आहे.

Tags

follow us