Ahmednagar Politics : शिर्डीच्या खासदाराची चलबिचल, थेट भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांच्या भेटीला

Ahmednagar Politics : शिर्डीच्या खासदाराची चलबिचल, थेट भारत राष्ट्र समितीच्या नेत्यांच्या भेटीला

Ahmednagar Politics : तेलंगणातील सत्ताधारी आणि देशभरात विस्तार करू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समिती (BRS) या पक्षाने सर्वात आधी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. महाराष्ट्रात बीआरएसने सुरुवातीलाच असे काही फासे टाकले आहेत की ज्यामुळे राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनीही बीआरएसच्या हालचाली टिपण्यास सुरुवात केली आहे. नांदेड या सीमावर्ती जिल्ह्यातून राज्यात प्रवेश केलेल्या या गुलाबी वादळाने आता थेट नगर जिल्ह्यात धडक मारली आहे. येथे पक्षाने राष्ट्रवादीत फोडाफोडी करत दिग्गज नेते घनश्याम शेलार यांना गळाला लावले. त्यानंतर आता श्रीरामपूर शहरातही चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.

‘आता काँग्रेसचा नंबर, त्यांचे घरही लवकरच फुटणार’; शिंदे गटाच्या आमदाराने उडवली खळबळ

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील या शहरात आज एक राजकीय घडामोड घडली ज्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारत राष्ट्र समितीचे तेलंगणातील खासदार बी. बी. पाटील यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. मुरकुटे यांनी पाटील यांच्यासह माणिक कदम, बाळासाहेब सानप यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे देखील आवर्जुन उपस्थित राहिले.

लोखंडे यांनी उपस्थिती दाखविल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. त्यामागे कारणही तसेच खास आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीआधी राज्यात अनेक उलथापालथी झालेल्या आहेत. शिवसेनेतील फूट त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी यांमुळे सारीच समीकरणे बदलली आहेत.

अजितदादा-शरद पवार भेटीनंतर मोठी घडामोड; राष्ट्रवादीने सोडला विरोधी पक्ष नेतेपदावरील हक्क

शिर्डीसाठी रामदास आठवले मैदानात; लोखंडेंची वाढली धाकधूक

लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या चर्चा सुरू असतानाच या घडामोडी घडल्याने सगळाच गोंधळ उडाला आहे.  कोणता मतदारसंघ कुणाकडे जाणार, कुणाला संधी मिळणार तर कुणाचा पत्ता कट होणार याचे चित्र स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांकडून मतदारसंघांवर दावा सांगितला जाऊ लागला आहे. राजकीय नेतेही यात मागे नाहीत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी याआधीही या मतदारसंघातून निवडणूक लढली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघावर दावा ठोकल्याने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची धाकधूक वाढली आहे.

खासदार लोखंडे सध्या शिंदे गटात आहेत. आगामी निवडणुकीसाठीही ते इच्छुक आहेत. मात्र जागावाटपाचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. जागावाटपात ही जागा कुणाला जाईल हे आताच सांगता येणे कठीण आहे. राज्यात सध्या घडत असलेल्या घडामोडींमुळे तर अंदाज बांधणेही कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक जण नव्या पर्यायाच्या शोधात निघाले आहेत. त्यात भारत राष्ट्र समितीचा पर्याय सगळ्यांनाच खुणावतो आहे. या पक्षाची राज्यातील घोडदौड पाहता अनेक राजकीय नेत्यांनी पक्षाचा झेंडा हातात घेतला आहे. खासदार लोखंडेही आज माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या घरी बीआरएस नेते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीवेळी उपस्थित होते.

मंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर शरद पवार काय म्हणाले? पटेलांनी सांगितलं भेटीत काय घडलं!

दरम्यान, या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील अजून समोर आलेला नाही. मात्र,  जागावाटपात जर ऐनवेळी पक्षाने तिकीट कापले तर अडचण नको म्हणून ते भेटीला गेले असावेत का,  असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे हे देखील नेवासा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.  त्यामुळे आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube