मंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर शरद पवार काय म्हणाले? पटेलांनी सांगितलं भेटीत काय घडलं!

मंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर शरद पवार काय म्हणाले? पटेलांनी सांगितलं भेटीत काय घडलं!

Prafulla Patel : राष्ट्रवादीतील राजकीय नाट्यानंतर आज पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील मंत्र्यांनी आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पुन्ही काही भूकंप होईल का अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट का घेतली याचा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली.

‘मुंबईकरांनो, त्यांचे पब, पार्टी अन् पेंग्विनवाले स्वार्थी राजकारण ओळखा’; शेलारांचा ठाकरेंवर घणाघात

ते म्हणाले, पवार साहेबांच्या पाया पडून आम्ही त्यांचे आशिर्वाद मागितले. आम्ही सर्वांनी त्यांना विनंतीही केली की आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहेच पण, पक्ष एकसंघ राहू शकतो त्यासाठीही योग्य विचार करावा आणि आागामी काळात आम्हाला मार्गदर्शन करावं. पवार साहेबांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. पण, यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात उद्यापासून आपापल्या विभागाची जबाबदारी पार पाडतील, असे पटेल यांनी यावेळी सांगितले.

देवगिरी बंगल्यावरील बैठक पार पडल्यानंतर अजितदादांसह सर्व मंत्री आणि नेते यशवंतराव चव्हाण सेंटरकडे रवाना झाले. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित होते. जयंंत पाटील हे उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये होते. मात्र सुप्रिया सुळे यांचा फोन येताच ते बैठक अर्ध्यावर सोडून तातडीने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आल्या होत्या. या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती नंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

आशुतोष काळे अजितदादांच्या गटात कसे गेले… वाचा पडद्यामागची कहाणी खुद्द त्यांच्याच जुबानी

दरम्यान, या भेटीमागे नुकताच आलेला राजकीय सर्व्हेचा धसका आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे. नुकताच साम वृत्तवाहिनीने केलेल्या सर्व्हेनुसार 64% मतदारांची सहानुभूती शरद पवार यांना असल्याचे दिसून आले होते. तर 23.3 टक्के लोकांनी शरद पवारांना सहानुभूती मिळणार नाही असे म्हटले आहे. याशिवाय 18 टक्के लोकांनी नाही असे मत नोंदविले होते. तर 18 टक्के लोकांनी सांगता येत नाही असे म्हटले होते. अजित पवार यांचा निर्णय राष्ट्रवादीच्या मतदारांना पटला नसल्याचे या सर्व्हेतून दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व फुटीर नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली का असा सवाल विचारला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube