China Australia Relations : जगभरात आपली मक्तेदारी निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेला चीन रोज (China Australia Relations) नवनवीन कारनामे करतच असतो. शेजारी देशांसह अन्य देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवण्याचे चीनचे उद्योग जगजाहीर आहेत. त्यातच आता आणखी एक बातमी आली आहे. चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देणारा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. तसं पाहिलं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Australia) यांच्यातील संबंध सुद्धा चांगले आहेत. क्वाड देशांच्या संघटनेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही देश आहेत. अशात चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वाढते संबंध भारताला डोकेदुखी तर ठरणार नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दोन्हा देशांनी घेतलेल्या निर्णयानुसार चीन आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांच्या देशातील नागरिकांना व्यापार आणि पर्यटनाच्या उद्देशाने मल्टिपल विसा एंट्री दिली जाणार आहे. दोन्ही देशांतील संबंधात सुधारणा होण्याच्या दिशेने केलेली कार्यवाही म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे. चीन ऑस्ट्रेलियाला एकतर्फी विजा मुक्त देशांच्या यादीत समाविष्ट करणार आहे. या निर्णयानुसार दोन्ही देशांतील नागरिकाना व्यापार आणि पर्यटनाच्या उद्देशाने तीन ते पाच वर्षांसाठी मल्टी एन्ट्री विजा जारी केला जाईल.
दलाई लामांना भेटण्यासाठी नॅन्सी पेलोसी भारत दौऱ्यावर; 2017 च्या भेटीनंतर चीनने दिला होता ‘हा’ इशारा
याआधी चिनी नागरिक ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी एक वर्षांपर्यंतच्या विजासाठी अर्ज करू शकत होते. वारंवार यात्रा करणारे नागरिक दहा वर्षांपर्यंतच्या विजासाठी अर्ज करू शकत होते. व्यापार आणि कौटुंबिक कारणांसाठी देशात येणाऱ्या नागरिकांसाठी चीन आपल्या धोरणात बदल करत आहे. दुसऱ्या देशांतील नागरिकांना देशात येण्यासाठी अडचणी येऊ नयेत यासाठीही चीन सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
मागील काही वर्षांपासून चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तणाव आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या अल्बानीज सरकारने चीन बरोबरील संबंधात सुधारणा करण्यास प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून तब्बल सात वर्षांनंतर चीनचे पंतप्रधान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. याआधी याच वर्षात चीनी विदेश मंत्र्यांनीही ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. काही वर्ष दोन्ही देशांतील संवाद बंद झाला होता. चीनने ऑस्ट्रेलियावर व्यापारिक निर्बंध लादले होते. यामुळे ऑस्ट्रे्लियाला वर्षाला तब्बल 13 अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागत होते.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज मागील वर्षातील नोव्हेंबर महिन्यात चीनला गेले होते. अँथनी अल्बानीज यांनी 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून कारभार हाती घेतला. तेव्हापासून चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध सुधारले आहेत. याआधी देशात लिबरल पार्टीचे सरकार होते. या सरकारच्या काळात दोन्ही देशांत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. कोरोना काळातही ऑस्ट्रेलियाने चीन विरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे चीन कमालीचा नाराज झाला होता.
चीनचा नेपाळमध्ये नवा उद्योग; ‘या’ प्रकल्पासाठी नेपाळ सरकारला फसवले?